Irrfan Khan | पानसिंग तोमर ते लाईफ ऑफ पाय, इरफान खानचे गाजलेले चित्रपट

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचे आज (29 एप्रिल) निधन (Irfan Khan hit Movies) झाले.

Irrfan Khan | पानसिंग तोमर ते लाईफ ऑफ पाय, इरफान खानचे गाजलेले चित्रपट

मुंबई : आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचे आज (29 एप्रिल) निधन (Irrfan Khan hit Movies) झाले. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी इरफानने अखेरचा श्वास घेतला. श्वासोच्छवासात त्रास होत असल्यामुळे काल (28 एप्रिल) त्याला मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Irrfan Khan hit Movies) होतं.

इरफान खानने आतापर्यंत अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपट आणि बऱ्याच मालिकांमध्येही काम केलं होतं. 2011 मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने आतापर्यंत जवळपास 30 वर्ष बॉलिवूड इंडस्ट्रीत काम केले आहे.

इरफान खानचे गाजलेले चित्रपट

 • लाईफ ऑफ पाय
 • बिल्लू
 • हिंदी मिडीयम
 • पिकू
 • द वॉरियर
 • मकबूल
 • हासिल
 • द नेमसेक
 • रोग
 • द लंच बॉक्स
 • तलवार
 • फेवरेट
 • डी-डे
 • मुंबई मेरी जान
 • करवान
 • मदारी
 • स्लमडॉग मिलेनिअर
 • ये साली जिंदगी
 • गुंडे
 • जुरासिक वर्ल्ड
 • जसबा
 • राईट या राँग
 • अंग्रेजी मिडियम

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित 

2003 मध्ये इरफान खानला हासिल चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2007 लाईफ इन मेट्रो चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला होता. याशिवाय पानसिंग तोमर या 2012 मध्ये प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला होता. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

2017 ला प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम या चित्रपटात त्यांनी अतिशय उत्तम काम केलं होते. त्यासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कारही मिळाला होता. भारत आणि चीनमध्ये हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट डिजीटल माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाला होता.

संबंधित बातम्या : 

प्रख्यात बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं निधन

Irrfan Khan | इरफान खान यांचे निधन, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रवास

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *