Irrfan Khan Died | तीन दिवसांपूर्वी इरफान खानच्या आईचे निधन, आईची शेवटची इच्छाही अपूर्ण

शनिवारी 25 एप्रिल 2020 रोजी इरफान यांची आई सईदा बेगम 95 व्या वर्षी यांचे निधन झाले (Irrfan Khan mother Died her last wish incomplete) होते.

Irrfan Khan Died | तीन दिवसांपूर्वी इरफान खानच्या आईचे निधन, आईची शेवटची इच्छाही अपूर्ण

मुंबई : आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर (Irrfan Khan mother Died her last wish incomplete) छाप सोडणाऱ्या बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. त्यांची तब्येत बिघडल्याने काल त्यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान इरफान यांची प्राणज्योत मालवली. अवघ्या तीन दिवसांपूर्वी जयपूरमध्ये इरफान खान यांची आई सईदा बेगम (95) यांचे निधन झाले होते. मात्र लॉकडाऊन असल्याने त्यांना आईच्या अंत्यसंस्कारासाठी जाता आले नव्हते.

शनिवारी 25 एप्रिल 2020 रोजी इरफान यांची आई सईदा बेगम यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले (Irrfan Khan mother Died her last wish incomplete) होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात  लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना आईच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईतून जयपूरला जाता आले नव्हते. इरफान यांनी व्हिडीओ कॉलद्वारे आपल्या आईचे अंत्यदर्शन घेतले होते.

मात्र शेवटच्या श्वासापर्यंत इरफान यांच्या आई त्यांच्यासाठी प्रार्थना करत होत्या. इरफान यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, “त्यांच्या आईने मरणापूर्वी इरफान या आजारातून नक्की बरा होईल. तो लवकरच घरी परतेल,” अशी इच्छा इरफान यांच्या आई सईदा बेगम यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या आईची ही इच्छा अपूर्ण राहिली. आज (29 एप्रिल) इरफान यांचे मुंबईत निधन झाले.

इरफान याने 2018 मध्ये न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर झाल्याची माहिती स्वत: ट्विटरवरुन दिली होती. या आजारावर परदेशात उपचार  घेतल्यानंतर गेल्यावर्षी ते भारतात परतले होते. यानंतर अंग्रेजी मीडियम या हिंदी चित्रपटाद्वारे पुन्हा कमबॅक केले होते. हा चित्रपट 13 March 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.

संबंधित बातम्या : 

प्रख्यात बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं निधन

Irrfan Khan | इरफान खान यांचे निधन, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रवास

Irrfan Khan | पानसिंग तोमर ते लाईफ ऑफ पाय, इरफान खानचे गाजलेले चित्रपट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *