चित्रपटगृहांच्या बाहेर शेंगदाणे विकायचा ‘हा’ अभिनेता; आज बॉलिवूडचा सुपरस्टार

कोणतंही फिल्मी बॅगग्राऊंड नसताना या अभिनेत्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलं. बरं हा अभिनेता फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधी चित्रपटगृहांच्या बाहेर शेंगदाणे विकायचा. आज हा अभिनेता बॉलिवूडचा सुपरस्टार आहे आणि करोडोंची संपत्ती आहे.

चित्रपटगृहांच्या बाहेर शेंगदाणे विकायचा हा अभिनेता; आज बॉलिवूडचा सुपरस्टार
| Updated on: Feb 01, 2025 | 1:46 PM

बॉलिवूडमध्ये प्रत्येकालाच आपली ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. त्यात जर एखाद्या व्यक्तीचं कोणतंही फिल्मी बॅगग्राऊंड नसेल तर अभिनेत्याला आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवावं लागतं. असंच काहीसं घडलं एका अभिनेत्यासोबत. तो फिल्म इंडस्ट्रीत आला आणि त्याने सर्व जिंकून घेतलं.पण त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.

चित्रपटगृहांच्या बाहेर शेंगदाणे विकायचा हा अभिनेता 

कोणतंही फिल्मी बॅगग्राऊंड नसताना या अभिनेत्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलं. बरं हा अभिनेता फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधी चित्रपटगृहांच्या बाहेर शेंगदाणे विकायचा. आज त्याच अभिनेत्याचे चित्रपट पाहायला लोक सिनेमागृहात जातात. या अभिनेत्याने आपल्या कष्टाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं काम आणि नाव कमावलं. हा अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ.

जॅकी श्रॉफ यांना ‘जग्गू दादा’ या नावाने ओळखतात. दमदार अभिनयासोबतच त्यांच्या अगदी सहज-साध्या जीवनशैलीसाठीही ओळखलं जात. बॉलिवूडप्रमाणेच प्रेक्षकांमध्येही त्यांची स्वतःची एक खास ओळख आहे. जॅकी दादा केवळ ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीनही खूप लोकप्रिय आहेत.

जॅकी श्रॉफ आज त्याचा 68 वा वाढदिवस

1 फेब्रुवारी 1957 रोजी जन्मलेले जॅकी श्रॉफ आज त्याचा 68 वा वाढदिवस आहे. जॅकी हे प्रचंड डाउन-टू-अर्थ आहेत. इतकी वर्ष इंडस्ट्रीत घालवल्यानंतरही त्यांच्या या स्वभावात काहीच फरक झाला नाही. ते आजही स्वत:ला त्याच चाळीत राहाणारा एक कॉमन मॅन मानतात.

बऱ्याच जणांना हे माहित नसेल की जॅकी श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधी चक्क चित्रपटगृहांच्या बाहेर शेंगदाणे विकायचे आणि कधी कधी चित्रपटांचे पोस्टर चिकटवायचे. जॅकी यांनी बराच काळ हे काम केले.

यानंतर जॅकीने एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत असताना एके दिवशी एका व्यक्तीने त्यांना मॉडेलिंगची ऑफर दिली. जॅकी यांना त्यांच्या पहिल्या कामासाठी 7000 रुपये मिळाले होते. यानंतर त्यांनी ट्रॅव्हलिंग एजन्सीची नोकरी सोडून मॉडेलिंग सुरू केली आणि हळूहळू त्यांना खूप काम मिळू लागलं.

पहिल्या चित्रपटाची ऑफर

मॉडेलिंग करत असताना त्यांची भेट देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद यांच्याशी झाली. त्यांच्या मदतीने जॅकी देव आनंदला भेटले. जॅकीला भेटताच देव आनंद यांनी त्यांना चित्रपटाची ऑफर दिली. त्यानंतर सुभाष घई यांनी जॅकीला हिरो या चित्रपटात कास्ट केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

जॅकी श्रॉफ यांची आज करोडोंची संपत्ती आहे. आज ते आलिशान घरात राहत, रॉयल लाइफस्टाइल जगतात. मात्र तरीही आज ते त्यांची चाळीची खोली प्रचंड आवडते. जिथे त्यांनी बालपण घालवलं. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये हे देखील बोलूनही दाखवलं आहे. आजही ते त्या चाळीत अनेकदा जातात. अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही बरेच दिवस जॅकी आपल्या आईसोबत चाळीतच राहत होते.

फोटोशूटसाठी गर्लफ्रेंडची बिकीनी घातली होती

जॅकी मॉडेलिंग करत असतानाचा एक किस्सा त्यांनी सांगितला होता. त्यांना एका फोटोशूटसाठी स्विमिंग ट्रंक घालणे आवश्यक होते. त्यावेळी जॅकी यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नसल्याने त्यांनी त्यांची मैत्रीण आयशाकडे मदत मागितली.

जॅकी यांनी मैत्रिणीकडे मदत मागितल्यानंतर तिने तिची टू-पीस बिकिनी त्यांना दिली. अशा परिस्थितीत 1980 मध्ये एका फोटोशूटदरम्यान जॅकी श्रॉफ यांनी गर्लफ्रेंड आयशाच्या बिकिनी घालून ते फोटोशूट केलं होतं.

जॅकी श्रॉफ यांची गणना आज दिग्गज स्टार्समध्ये केली जाते. जॅकीचा मुलगा टायगर बॉलिवूडमध्ये आपलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोवत आहे. तर त्यांची मुलगी कृष्णा देखील एक व्यावसायिका आहे. जॅकी यांची एकूण संपत्ती 112 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.