Jackie Shroff | आज अर्धी अंधेरी माझी असती पण…, जॅकी श्रॉफ यांच्याकडून खंत व्यक्त, मुलांना दिला महत्त्वाचा सल्ला

Jackie Shroff | आज अर्ध्या अंधेरीवर असतं जॅकी श्रॉफ यांचं राज्य, पण…,त्यांच्याकडून खंत व्यक्त, आयुष्यातील 'ती' मोठी चूक आणि मुलांना दिला महत्त्वाचा सल्ला..., जॅकी श्रॉफ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

Jackie Shroff | आज अर्धी अंधेरी माझी असती पण..., जॅकी श्रॉफ यांच्याकडून खंत व्यक्त, मुलांना दिला महत्त्वाचा सल्ला
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 10:34 AM

Jackie Shroff | अभिनेते जॅकी श्रॉफ यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सांगायचं झालं तर, जॅकी श्रॉफ फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. दरम्यान एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी मनातील खंत देखील बोलून दाखवली. अभिनेत्याने आयुष्यात काही चुकीचे निर्णय घेतले, ज्याचा पश्चाताप आजही त्यांना होत आहे. एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी मनातील खंत अखेर बोलून दाखवली. मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांच्यासोबत मुलगी कृष्णा श्रॉफ देखील होती.

आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांवर खंत व्यक्त करत जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘मला कार प्रचंड आवडतात म्हणून मी अनेक कार खरेदी केल्या. योग्य विचार करुन मी माझे पैसे एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवायला हवे होते. पण तेव्हा मी फक्त कार खरेदी केल्या. प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवले असते, तर आज अर्ध्या अंधेरीवर माझं राज्य असतं…’ असं जॅकी श्रॉफ म्हणाले होते.

एवढंच नाही तर, जॅकी श्रॉफ यांनी तरुणांना देखील प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. जॅकी श्रॉफ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी कार आणि बाईक्सची प्रचंड आवड आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये वेग-वेगळ्या प्रकारच्या महागड्या गाड्या आहेत.

हे सुद्धा वाचा

मुलगी कृष्णा श्रॉफला म्हणाले कंजूस…

मुलाखतीत कृष्णा श्रॉफ हिला देखील प्रश्न विचारण्यात आला. स्वतःचा खर्च कसा मॅनेज करतेस? यावर जॅकी म्हणाले, ‘कृष्णा प्रचंड कंजूस आहे… तिने अद्याप सिनेमांमध्ये पदार्पण केलं नाही. पण ती तिच्या भावाप्रमाणे फिटनेस फ्रिक आहे. ती एक पॉडकास्ट होस्ट करते. कृष्णा दक्षिण आशियातील आघाडीच्या MMA मॅट्रिक्स फाईट नाईटची सह-मालक देखील आहे.

जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफची प्रॉपर्टी

जॅकी श्रॉफ यांचा मुलागा आणि अभिनेता टायगर श्रॉफ कायम नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यास प्राधान्य देतो. नुकताच अभिनेत्याने पुण्यात नवीन घर घेतलं आहे. . रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या नव्या घराची किंमत 7.5 कोटी रुपये आहे. नव्या घरासाठी अभिनेत्याने 52.5 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. मुंबईत देखील टायगर याचं 8 बीएचके फ्लॅट आहे. ज्याची किंमत 35 कोटी रुपये आहे.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.