Jacqueline Fernandez | जॅकलीन फर्नांडिस हिने मुंबईत खरेदी केले आलिशान घर, जिम, स्विमिंग पूल आणि बरेच काही

बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जॅकलीन फर्नांडिस हिने नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस हिचे पाय खोलात असल्याचे देखील स्पष्ट झाले.

Jacqueline Fernandez | जॅकलीन फर्नांडिस हिने मुंबईत खरेदी केले आलिशान घर, जिम, स्विमिंग पूल आणि बरेच काही
| Updated on: Jul 02, 2023 | 9:52 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जॅकलीन फर्नांडिस ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पर्सनल लाईफमुळे तूफान चर्चेत आहे. जॅकलीन फर्नांडिस हिचे नाव सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. जॅकलीन फर्नांडिस हिचे पाय सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) प्रकरणात खोलात असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले आहे. फक्त जॅकलीन फर्नांडिस हिच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री (Actress) या सुकेश चंद्रशेखर याच्या संपर्कात असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस हिची बऱ्याच वेळा चाैकशी देखील झालीये. सुकेश चंद्रशेखर गेल्या अनेक दिवसांपासून 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली येथे तुरुंगात आहे. या प्रकरणामुळे जॅकलीन फर्नांडिस हिची काही संपत्ती देखील जप्त करण्यात आलीये. फक्त जॅकलीन फर्नांडिस हिच नाही तर सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही हिचे देखील नाव आल्याचे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेही आणि इतर अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात होत्या. सुकेश चंद्रशेखर हा बाॅलिवूडच्या अभिनेत्रींना महागाडे गिफ्ट देत असल्याचे देखील सांगितले जाते. इतकेच काय तर जॅकलीन फर्नांडिस ही सुकेशच्या प्रेमात इतकी जास्त आंधळी होती की, तिला चक्क सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत लग्न करायचे होते.

नुकताच जॅकलीन फर्नांडिस हिने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या अशा भागामध्ये जॅकलीन फर्नांडिस हिने घर खरेदी केले आहे जिथे दीपिका पादुकोण आलिया भट्ट, करिना कपूर, सैफ अली खान असे स्टार तिचे शेजारी आहेत. अत्यंत महागडे आलिशान घर जॅकलीन फर्नांडिस हिने खरेदी केले आहे.

मुंबईतील बांद्रा पश्चिम भागामध्ये जॅकलीन फर्नांडिस हिने घर खरेदी केले आहे. पाली हिल या पॉश परिसरात हे घर आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी देखील याच परिसरात अजून एक घर खरेदी केले आहे. रिपोर्टनुसार या इमारतीमध्ये 3 बीएचके आणि 4 बीएचके प्लॅट असून जिम आणि स्विमिंग पूल देखील आहे.

या इमारतीमध्ये प्लॅटची किंमत ही 12 कोटींपासून सुरू होते. म्हणजेच जॅकलीन फर्नांडिस हिने या फ्लॅटसाठी तगडी रक्कम मोजली आहे. ईडीकडून जॅकलीन फर्नांडिस हिची 7.27 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये आता जॅकलीन फर्नांडिस हिने आलिशान फ्लॅटची खरेदी केली आहे.