AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jacqueline Fernandez | ‘ड्राईव्ह’ची वर्षपूर्ती, जॅकलीन फर्नांडिस सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावूक!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या ‘ड्राईव्ह’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज 1 वर्षपूर्ण होत आहे. यावेळी जॅकलीन फर्नांडिसला सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे. ती भावूकही झाली आहे.

Jacqueline Fernandez | ‘ड्राईव्ह’ची वर्षपूर्ती, जॅकलीन फर्नांडिस सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावूक!
| Updated on: Nov 02, 2020 | 3:22 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या ‘ड्राईव्ह’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज 1 वर्षपूर्ण होत आहे. यावेळी जॅकलीन फर्नांडिसला सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे. ती भावूकही झाली आहे. ‘ड्राईव्ह’ चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जॅकलीन फर्नांडिसने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. फिल्म दिग्दर्शक तरुण मनसुखानी यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केले. ज्यावर लिहिले आहे की, ‘ड्राईव्ह’ला 1 वर्ष पूर्ण! इंस्टाग्रामवर परत त्यांनी दुसरी स्टोरी शेअर केली आहे. त्यात सुशांत सिंह राजपूतसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि लिहले, ‘आज तू आमच्यासोबत पाहिजे होतास. आम्हाला तुझी खूप आठवण येत आहे. (Drive movie 1Year completed Jacqueline Fernandez missed sushant Singh Rajput) तरुण मनसुखानी पुढे लिहतात की, ‘ड्राईव्ह’ चित्रपट रिलीज होऊन आज एक वर्षपूर्ण होत आहे. पण याच आम्ही काहीच सेलिब्रेशन करणार नाही, कारण सुशांत आमच्यामध्ये नाही. ड्राईव्ह चित्रपटासोबत सुशांत अनेक आठवणी आमच्या जवळ सोडून गेला आहे. पण ‘ड्राईव्ह’च्या सर्व टिमचे धन्यवाद. यावर जॅकलीन फर्नांडिस म्हणते की, तरुण हा चित्रपट माझ्यासाठी नेहमीच खास असणार आहे. सुशच्या काही आठवणी याच्याशी जोडलेल्या आहेत आणि त्या खूप खास आहेत.

नुकतीच इंस्टाग्रामवर जॅकलीनचे 46 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जॅकलीनने चाहत्यांचे खास पद्धतीने आभार मानले. तिने तिचा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पिवळे आणि गुलाबी रंगाचे गुलाब हातात धरून होते,तिने लिहले, ‘लव्ह यू थॅक यू ….’ सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी सापडला होता. सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल मुंबई पोलिस कारवाई करत असताना त्याच्या वडिलांनी 25 जुलै रोजी रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांविरोधात पाटणा येथील राजीव नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुशांतचा प्रवास स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते. 2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले. एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले.

संबंधित बातम्या : 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध निर्माते आदित्य चोप्रा यांची 3 तास कसून चौकशी

Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतला डिप्रेशनमध्ये कुणी ढकललं? आतापर्यंत 30 जणांचे जबाब

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल, गुदमरुन मृत्यू झाल्याचा निष्कर्ष

(Drive movie 1Year completed Jacqueline Fernandez missed sushant Singh Rajput)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.