AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दु:खाचा डोंगर; आईच्या निधनाने खचली अभिनेत्री

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जॅकलिनची आई किम फर्नांडिस यांचं निधन झालं आहे. 24 मार्च रोजी त्यांना स्ट्रोक आल्यानंतर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दु:खाचा डोंगर; आईच्या निधनाने खचली अभिनेत्री
Jacqueline Fernandez with mother Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2025 | 1:05 PM
Share

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिची आई किम फर्नांडिसचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या रुग्णालयात दाखल होत्या. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. किम यांना हार्ट स्ट्रोक आला होता आणि त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. आई रुग्णालयात असताना जॅकलिन पूर्ण वेळ त्यांची देखभाल करत होती. 24 मार्च रोजी किम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी जॅकलिनला लिलावती रुग्णालयाबाहेर पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचे काही फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले.

जॅकलिन आयपीएलमध्ये परफॉर्म करणार होती. 26 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामनादरम्यान गुवाहाटीमध्ये ती परफॉर्म करणार होती. परंतु दोन दिवसांपूर्वीच आईची प्रकृती बिघडल्याने ती आयपीएलमध्ये परफॉर्म करायला गेली नाही. जॅकलिनच्या आईची तब्येत बिघडल्याचं समजताच अभिनेता सलमान खानसुद्धा त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचला होता. सलमान आणि जॅकलिन यांच्यात चांगली मैत्री आहे. या दोघांनी ‘रेस 3’, ‘राधे’, ‘किक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. लॉकडाऊनच्या काळात जॅकलिन सलमानच्या पनवेल इथल्या फार्महाऊसमध्ये राहत होती.

2022 मध्येही किम यांना स्ट्रोक आला होता आणि त्यावेळी बहरीन इथल्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जॅकलिनची आई बहरीनमधील मनामा इथं राहत होत्या. त्यांची पार्श्वभूमी बहुसांस्कृतिक असून त्यांना मलेशियन आणि कॅनेडियन वारसा आहे. तिचे आजोबा कॅनेडियन होते, तर तिचे पणजोबा गोव्यातील होते.

जॅकलिनने 2009 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘अलादीन’ या चित्रपटात तिने अभिनेता रितेश देशमुखसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘हाऊसफुल 2’, ‘मर्डर 2’, ‘किक’, ‘ब्रदर्स’, ‘ढिशूम’, ‘जुडवा 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. काही दिवसांपूर्वी तिचा ‘फतेह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये तिने सोनू सूदसोबत स्क्रीन शेअर केला होता.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ