महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत थेट ‘या’ पार्टीमध्ये पोहचली जान्हवी कपूर, व्हिडीओ व्हायरल
जान्हवी कपूर ही सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर दिसली.

मुंबई : बोनी कपूर यांची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटांपेक्षा सध्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नुकताच आता जान्हवी कपूर ही तिची लहान बहीण खुशी कपूर हिच्या बर्थडे पार्टीमध्ये पोहचली. विशेष म्हणजे यावेळी तिच्या आयुष्यातील अत्यंत खास व्यक्ती देखील तिच्यासोबत होती.
जान्हवी कपूर ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाला डेट करतंय, अशी चर्चा आहे. सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे कायमच एकसोबत स्पाॅट होतात. आता नुकताच खुशी कपूर हिच्या बर्थडे पार्टीला देखील जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया पोहचले. याचे काही व्हिडीओ पुढे आले.
View this post on Instagram
फक्त जान्हवी कपूर हीच नाही तर या पार्टीला शाहरूख खान याची लेक सुहाना खान ही देखील पोहचली. यावेळी सुहाना खान ही जबरदस्त लूकमध्ये दिसली. खुशी कपूर आणि सुहाना खान या एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसणार आहेत. याच चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील आहे.
काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनीच केली. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर ही दिसली होती. मात्र, चित्रपट फ्लाॅप गेला.
View this post on Instagram
काही दिवसांपासून जान्हवी कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी काही दिवसांपूर्वीच गुपचूप पद्धतीने साखरपुडा केलाय. मात्र, यावर अजूनही खुलासा हा होऊ शकला नाहीये. मात्र, नेहमीच जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया स्पाॅट होताना दिसतात.
