Video | वर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवलं कतरिना कैफचं गाणं, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल हसू…

Video | वर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवलं कतरिना कैफचं गाणं, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल हसू...
जान्हवी कपूर

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) स्वत:ला फिट ठेवण्यासाठी बरीच कसरत करत असते. बऱ्याचदा ती जिममध्ये जाताना स्पॉट होते.

Harshada Bhirvandekar

|

Apr 12, 2021 | 11:41 AM

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) स्वत:ला फिट ठेवण्यासाठी बरीच कसरत करत असते. बऱ्याचदा ती जिममध्ये जाताना स्पॉट होते. बॉलिवूडच्या या कलाकारांचे तंदुरुस्त शरीर पाहून आपणही म्हणतो की, आपल्याला त्यांच्यासारख्या शरीराची आवश्यकता आहे. परंतु, त्यामागील त्यांच्या कठोर परिश्रमांबद्दल आपल्याला कल्पना नसते. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे कलाकार कठोर परिश्रम करतात. कधीकधी ते स्वतःदेखील या गोष्टींना कंटाळतात. आता जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही याची नक्की खात्री पटेल (Janhvi Kapoor singing sheela ki jawani song while doing workout funny video).

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, वर्कआउट्स करताना जान्हवी कपूर किती मेहनत करत आहे. त्यानंतर थकलेल्या जान्हवीने स्वत:ला प्रेरणा देण्यासाठी चक्क कतरिनाचे ‘शीलाकी जवानी’ हे गाणे गायले. हे पाहून तिचे प्रशिक्षकही हसायला लागले. यानंतर, थकलेली जान्हवी शेवटी वेदना आणि थकवा यामुळे खाली बसली. व्हिडीओमध्ये तुम्हाला हसू येईलच, पण जान्हवीची मेहनत पाहून तिचे कौतुकही वाटेल.

पाहा जान्हवी कपूरचा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Tony Wick (@tonywick_sharma)

(Janhvi Kapoor singing sheela ki jawani song while doing workout funny video)

मालदीवमध्ये जान्हवीची धमाल

जान्हवी अलीकडेच तिच्या मित्रपरिवारासह मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. कामापासून विश्रांती घेत, तेथील मित्रांसह तिने खूप मजा केली. याशिवाय या काळात जान्हवीचा बोल्ड अवतारही चर्चेत होता. सिल्व्हर शिमर बिकीनीपासून ते प्रिंट आऊटफिटपर्यंत जान्हवीची ही हॉट स्टाईल पाहून चाहते खूपच प्रभावित झाले होते (Janhvi Kapoor singing sheela ki jawani song while doing workout funny video).

जान्हवीकडे कामांची रांग

जान्हवीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलयाचे तर, ती नुकतीच रुही या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जान्हवीबरोबर अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत दिसले होते. ‘हॉरर कॉमेडी’ असलेल्या या चित्रपटात जान्हवीची व्यक्तिरेखा खूपच पसंत केली गेली. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.

आता लवकरच जान्हवी ‘गुडलक जेरी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती एका पंजाबी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील तिच्या लूकची एक झलकही समोर आली होती, ज्यामध्ये ती खूप क्युट दिसत होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रपटाचे शूटिंग सध्या बंद झाले आहे.

कार्तिकसोबत ‘दोस्ताना 2’मध्ये झळकणार

याखेरीज जान्हवी कपूर ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवीसह अभिनेता कार्तिक आर्यन आणि लक्ष्य दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे लक्ष्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या आधीच्या भागात अभिनेता जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. स्क्रिप्टमध्ये काही बदल झाल्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगला उशीर होत आहे. याशिवाय कोव्हिडमुळे देखील चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होण्यास विलंब होत आहे.

(Janhvi Kapoor singing sheela ki jawani song while doing workout funny video)

हेही वाचा :

Bappi Lahiri | कोरोनावर यशस्वी मात, बप्पी लहरींना मिळाला डिस्चार्ज! पोस्ट करत म्हणाले…

BAFTA Awards 2021 : पुरस्कार सोहळ्यात ऋषी कपूर-इरफान खानच्या आठवणींना उजाळा, प्रेक्षकही झाले भावूक!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें