जान्हवी कपूरने जुहूमध्ये खरेदी केलंय नवं आलिशान घर, किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

जान्हवी कपूरने जुहूमध्ये खरेदी केलंय नवं आलिशान घर, किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर (Jahnavi Kapoor) सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. वृत्तानुसार, जाह्नवीने मुंबईत एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 05, 2021 | 9:28 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर (Jahnavi Kapoor) सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. वृत्तानुसार, जाह्नवीने मुंबईत एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीची किंमत लाखोंमध्ये नव्हे तर कोट्यवधींमध्ये आहे. जाह्नवीच्या नवीन घराची किंमत 39 कोटी आहे. जाह्नवी कपूरने डिसेंबर 2020 मध्ये ही प्रॉपर्टी विकत घेतली आहे. स्कायर फीट इंडियाच्या रिपोर्टनुसार, जाह्नवीचे हे नवीन घर मुंबईच्या जुहू परिसरात आहे.(Jahnavi Kapoor bought a new house in Juhu)

या घराता करार 7 डिसेंबर रोजी झाला आहे. वृत्तानुसार, जाह्नवीनेही घरासाठी 78 लाख रुपये शुल्क देखील भरले आहे.जाह्नवीने ‘धडक’ चित्रपटातून 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. ती अखेर गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट लॉकडाउनमुळे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. लवकरच ती दोस्ताना 2 मध्ये रुही अफ्झा आणि कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.

जाह्नवी सध्या कार्तिक आर्यनसोबत गोव्यात सुट्टी साजरी करत आहेत. या दोघांचे गोव्यातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. नुकतीच आलिया भट्ट आणि हृतिक रोशन यांनीही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. जिथे रणबीर कपूर राहतो त्याच कॉम्प्लेक्समध्ये आलियाने एक अपार्टमेंट खरेदी केली आहे. हृतिक रोशनने जुहूमध्ये सुमारे 100 कोटींचा पेन्टहाउस खरेदी केले आहे.

मदर्स डेला जान्हवी कपूरने श्रीदेवीबरोबर बालपणातील एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला होता. जान्हवी कपूर श्रीदेवीच्या मांडीवर बसलेली दिसत होती. फोटो शेअर करताना जान्हवी कपूरने लिहिले आहे, यांचे ऐकले पाहिजे आणि यांच्यावर सर्वात जास्त प्रेम केले पाहिजे. हॅप्पी मदर्स डे श्रीदेवी यांचा पुण्यतिथी निमित्ताने मुलगी जान्हवी कपूर भावुक झाली होती. तिने सोशल मीडियावर भावूक कॅप्शन देत फोटो शेअर करत पोस्ट लिहिली होती. जान्हवीने आपल्या ईन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो शेअर केला होता. तो फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, या फोटोमध्ये जान्हवी आणि श्रीदेवी आहे.

संबंधित बातम्या : 

Bollywood मध्ये स्टार किड्सचा दबदबा, 2019 मध्ये कोणा कोणाचं पदार्पण

Photo : जान्हवी कपूरचा रेट्रो अंदाज, इन्स्टाग्रामवर लाइक्सचा पाऊस

(Jahnavi Kapoor bought a new house in Juhu)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें