AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’

बडोद्यातील कार अपघातप्रकरणी अभिनेत्री जान्हवी कपूरने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी पहाटे एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने भरधाव कारने काही दुचाकींना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.

बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली 'अशा प्रकारच्या वागण्याने..'
Janhvi Kapoor on vadodara car accidentImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 17, 2025 | 10:52 AM
Share

गुजरातमधील बडोदा शहरात शुक्रवारी पहाटे एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने भरधाव कारने काही दुचाकींना धडक दिली. या अपघातात एका दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला, तर चौघं जण जखमी झाले. या तरुणाने मद्यप्राशन केल्याचं पोलिसांनी सांगितलं. करेलीबाग परिसरातील मुक्तानंद चौकात हा अपघात झाला. त्यानंतर चालक रक्षित चौरसिया याला अटक करण्यात आली. चौरसियाला पकडणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं की, तो दारू पिऊन गाडी चालवत होता आणि गाडीततून बाहेर पडल्यानंतर “अनादर राऊंड, अनादर राऊंड” असं ओरडत होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री जान्हवी कपूरनेही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

बडोदा कार अपघाताची बातमी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत त्यावर जान्हवीने लिहिलं, ‘हे भयावह आणि संतापजनक आहे. अशा प्रकारच्या वागण्याने सुटका होईल असं कोणालाही वाटणंच मला त्रासदायक वाटतंय. मग ती व्यक्ती नशेत असो वा नसो.’ बडोदा कार अपघातातील मृत महिलेचं नाव हेमाली पटेल असं आहे. चौरसिया मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी आहे. तो कायद्याचा विद्यार्थी असून पेईंग गेस्ट म्हणून एका ठिकाणी राहत होता. ही कार त्याचा मित्र मित चौहानची होती, जो चालकाच्या बाजूच्या आसनावर बसला होता. अपघातानंतर तो पळून गेला, असं पोलिसांनी सांगितलं. पोलीस मितचा शोध घेत आहेत.

माध्यमांमध्ये दाखवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरधाव वेगाने येणारी कार दोन स्कूटरना धडकताना आणि त्यावरील प्रवाशांना खाली पाडून त्यांना ओढत घेऊन जाताना दिसत आहे. पोलिसांनी आरोपी रक्षित चौरसियाविरुद्ध मद्यपान करून गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्याने असा दावा केलाय की अपघाताच्या रात्री तो मद्यधुंद नव्हता. या घटनेबाबत विविध स्तरांतून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. अशा आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवण्याची त्यांची हिंमत होणार नाही, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

Follow Us
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण
बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं...
Shambhuraj Desai : बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले?
शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या
Shivsena Hearing Case : शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हिपच्या वैधतेवर उपस्थित केले प्रश्न
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
Vijay Wadettiwar : हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; विजय वडेट्टीवारांचं शिंदे सेनेला थेट आव्हान
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली