
बॉलिवूडचे अनेक कलाकार असे आहेत जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी श्रद्धा मानतात. त्या गोष्टींना फॉलो करतात. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जी स्वतःला अंधश्रद्धाळू मानते आणि वाईट नजर लागू नये म्हणून बरेच अजब टोटके करत असते. हा खुलासा या अभिनेत्रीने स्वत:च केला आहे. ही अभिनेत्री आहे जान्हवी कपूर.
ती स्वतःला अंधश्रद्धाळू मानते
जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘परम सुंदरी’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. जान्हवी पडद्यावर किती बोल्ड दिसत असली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र फार गोष्टींना मानते. बऱ्याच गोष्टींबाबत श्रद्धा ठेवते. ती कितीही लक्झरी लाईफ जगत असली तरी देखील ती स्वतःला अंधश्रद्धाळू मानते. अभिनेत्रीने स्वतः तिच्या मुलाखतींमध्ये याबाबत खुलासा केला आहे.
नॉनवेज खाण्यासाठी वार पाळते.
एकदा ती तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते. तिथेही तिने ती अंधश्रद्धाळू असल्याचे कबूल केले होते. ती म्हणाली होती की, जरी ती मांसाहारी असली तरी ती गुरुवारी मांसाहार कधीही खात नाही. ती नॉनवेज खाण्यासाठी वार पाळते. तसेच तिने सांगितले की कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी ती तिरुपती मंदिरात जाते, प्रार्थना करते जेणेकरून सर्व काही व्यवस्थित होईल.
pragya.vijh_astrotalks इंस्टाग्रामपेज
वाईट नजर लागू नये म्हणून…
याशिवाय, एका मुलाखतीत जान्हवीने असेही सांगितले की तिला वाईट नजर लागण्यावर देखील खूप विश्वास आहे तसेच तिचा अनुभव देखील आहे. म्हणूनच, ती त्यापासून बचाव करण्यासाठी अनेक गोष्टी करते. त्यामुळे ती बऱ्याचदा समुद्री मीठ पाण्यात मिसळून आंघोळ करते. तसेच काळ्या रंगाचे ओब्सिडियन ब्रेसलेट देखील घालते. जेणेकरून वाईट नजरेपासून तिला संरक्षण मिळू शकेल. आणि हे ब्रेसलेट बऱ्याचदा जान्हवीच्या हातात दिसलं देखील आहे. कान्समध्येसुद्धा जान्हवीच्या हातात काळा धागा दिसला होता.
जान्हवी कपूरच्या कामाबद्दल…
‘परम सुंदरी’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, जान्हवी कपूर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. तथापि, त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.