Bigg Boss 14 | जास्मीन भसीनच्या चाहत्यांना मोठा धक्का, ट्विटरवर ‘हा’ हॅशटॅग ट्रेंड!

बिग बॉस 14 (Bigg Boss 14)चा  एक प्रोमो समोर आला असून त्यात अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक, अली गोनी आणि जास्मीन भसीन यांच्यापैकी एकाची जोडी मोडणार आहे.

Bigg Boss 14 | जास्मीन भसीनच्या चाहत्यांना मोठा धक्का, ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंड!
| Updated on: Jan 10, 2021 | 12:36 PM

मुंबई : बिग बॉस 14 (Bigg Boss 14)चा  एक प्रोमो समोर आला असून त्यात अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक, अली गोनी आणि जास्मीन भसीन यांच्यापैकी एकाची जोडी मोडणार आहे. रिपोर्ट्सनुसार, जास्मीन भसीन बिग बॉसच्या शोमधून बाहेर जाणार आहे. जास्मीनच्या चाहत्यांना ही बातमी जेंव्हापासून समजली आहे तेंव्हापासून ट्विटरवर जेस्मीन भासीन बॅक (BringJasminBhasinBack) हा हॅशटॅग ट्रेंड केला जात आहे. या हॅशटॅगची 1.2 दशलक्ष ट्विट झाली आहेत.(Jasmine Bhasin out of Bigg Boss’s house)

जास्मीन बिग बॉसच्या घरातून बेघर झाल्याचे समजल्यावर देवोलीना भट्टाचार्यने प्रतिक्रिया दिली आहे. देवोलिनाने लिहिले की, ही बातमी खरी असेल याची शक्यता कमी आहे, पण जर खरी असेल तर मला वाटते की, जास्मीनसाठी हे योग्य आहे. कारण शोमध्ये जास्मीन खूप स्वार्थी दिसत होती.

बिग बॉसच्या घरात पवित्रा पुनिया एजाज खानला भेटायला आली होती. एजाज, पवित्राला म्हणतो की, तुझी मला खूप आठवण येत होती. तुला बोलण्याची पण मला खूप इच्छा होत होती माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायला मी तयार आहे यावर पवित्रा हसते. एजाज पवित्राला पुढे म्हणतो की, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो यावर पवित्रा देखील म्हणते की, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते.

निक्की आणि अली ही मज्जाक घरातील सर्वच सदस्यांना भारी पडली. बिग बॉसने घरातील इतर सदस्यांना सांगितले की, त्यांनी केलेल्या चुकीचे सजा तुम्हाला सर्वांना भेटणार आहे. त्यानंतर घरातील इतर सदस्य निक्की आणि अलीला भांडताना दिसले होते. विकास गुप्ता आणि अर्ची खानमध्ये भांडणे झाली होती. त्यावेळी अर्शी खानने विकास गुप्ता यांच्या आईवर भाष्य केले होते, त्यानंतर विकासने तिला पाण्यात ढकलले होते. अर्शीला पाण्यात ढकल्यामुळे विकास गुप्ताला बिग बॉसच्या घरातून बेघर देखील व्हावे लागले होते.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | सलमान खानवर रुबीनाचे चाहते भडकले, पाहा काय म्हणाले!

Bigg Boss 14 | राखी सावंतने केले जास्मीन आणि अलीच्या नात्यावर मोठे भाष्य!

(Jasmine Bhasin out of Bigg Boss’s house)