Bigg Boss 14 | सलमान खानवर रुबीनाचे चाहते भडकले, पाहा काय म्हणाले!

लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14 (Bigg Boss 14) सध्या चांगलेच रंगात आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

Bigg Boss 14 | सलमान खानवर रुबीनाचे चाहते भडकले, पाहा काय म्हणाले!

मुंबई : लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14 (Bigg Boss 14) सध्या चांगलेच रंगात आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस 14’ आधिकच चर्चेत आले आहे. आता बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा बघायला मिळाला आहे. घरामध्ये अर्शी खान रूबीनाला बोलते त्यावेळी रूबीना तिला बोट दाखवते त्यावेळी अर्शी रूबीनाला बोट का दाखवते म्हणून भांडणे करते. त्यावेळी रूबीना आणि अर्शीमध्ये जोरदार भांडणे बघालया मिळतात. (Rubina Dilaik Target at Big Boss’s house)

यावरूनच सलमान खान वीकेंड वॉरमध्ये रूबीनाची क्लाॅस लावतो सलमान म्हणतो की, अशाप्रकारे बोट दाखवण्याचा अर्थ नेमका काय आहे यावर सलमान अभिनवला विचारतो की, यांचा अर्थ काय होतो मात्र, अभिनवला पण याबद्दल काहीही माहीती नाही. सलमान घरातील इतर सदस्यांना देखील विचारतो त्यावेळी अर्शी म्हणते की, याचा अर्थ म्हणजे रूबीना संपूर्ण घराला तिच्या बोटावर नाचवत आहे. मात्र, यावेळी रूबीना म्हणते की, हे चुकीचे आहे आणि रूबीना सलमान खानला म्हणते यावर मी काही बोलू का? पण सलमान रूबीना काही बोलण्याची संधी देत नाही.

यामुळे रूबीनाचे चाहते चिडले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मागील सीजनला शहनाज गिलने देखील अशाच प्रकारचे बोट दाखवले होते पण त्यावेळी सलमान खान तिला काहीही बोलला नव्हता मग प्रत्येक वेळी रूबीनालाच का टार्गेट केले जाते. राखी सावंतचे कौतुक करताना सलमान म्हणतो की, राखीला दुखापत झाल्यानंतरही तिने घराबाहेर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सलमान पुढे म्हणतो की, विकास गुप्ता सोडून घरातील सर्वच सदस्य राखी सावंतला टार्गेट करत आहेत. या आठवड्याचा पूर्ण शो तिच्यावरच चालला आहे आणि तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. हे बोलणे ऐकून राखी भावनिक होते आणि हात जोडून सर्वांचे आभार मानते. यावेळी सलमान पुढे म्हणाले की, जेव्हा घरात राखीला टार्गेट केले जाते, तेव्हा घरात फक्त राखी गुप्ता राखीचे समर्थन करतो कारण त्यालाही अशाच प्रकारे घरात टार्गेट केले जात होते.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात नवी वाईल्ड कार्ड एंट्री, कॅप्टनपदासाठी पुन्हा तगडी स्पर्धा!

Bigg Boss 14 | खेळादरम्यान निक्की तंबोलीचे घृणास्पद कृत्य, चाहत्यांकडून थेट ‘स्वामी ओम’शी तुलना!

(Rubina Dilaik Target at Big Boss’s house)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI