AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी तुमचं काय जळतंय ते पहा… जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावलं, उत्तर ऐकून म्हणाल…

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणावादरम्यान जावेद अख्तर यांनी मोकळेपणाने भाषण केले. त्यांनी पाकिस्तानला पुन्हा लक्ष्य केले. मात्र याचदरम्यान, पाकिस्तानी अभिनेत्रीने भारतातील मुस्लिमांच्या स्थितीचा हवाला देत ज्येष्ठ लेखर असलेल्या अख्तर यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला. मात्र जावेद अख्तर यांनी तिला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काय म्हणाले जावेद अख्तर, जाणून घेऊया...

आधी तुमचं काय जळतंय ते पहा... जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावलं, उत्तर ऐकून म्हणाल...
| Updated on: May 31, 2025 | 10:23 AM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारातने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकमधील काही दहशतवादी तळांना लक्ष्य करत ते उद्ध्वस्त केले. त्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. मात्र भारताच्या या कारवाईमुळे पाकचा जळफळाट झाला असून तेथील अनेक सेलिब्रिटींनीही भारताविरुद्ध गरळ ओकली. त्याच दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी हिने नुकतीच भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित करून जावेद अख्तर यांच्यावर टीका केली. मुस्लिम असलेल्या जावेद अख्तर यांना हिंदू लोक घरही देत ​​नाहीत, अशी खालच्या थराची टीका त्यांनी केली. त्यामुळे भारत-पाक तणावादरम्यान त्यांनी ( जावेद अख्तर) नसीरुद्दीन शाह यांच्यासारखं गप्प राहिलं पाहिजे आणि याविषयावर काहीही टिप्पणी करू नये, अशी मुक्ताफळं तिने उधळली.

मात्र तिच्या या टीकेनंतर जावेद अख्तर यांनीही पाकिस्तानी अभिनेत्रीला थेट सुनावलं. मुस्लिमांना भारतात घरं मिळत नाही, त्यामागचं खरं कारण म्हणजे पाकिस्तान आणि पाकिस्तानी आहेत, असं परखड उत्तर त्यांनी दिलं. लल्लनटॉपशी बोलताना, जावेद अख्तर यांनी बुशरा अन्सारी यांच्या ‘मुस्लिमांना घरे मिळत नाहीत’ या टिप्पणीवर उत्तर दिले.’मी कधी बोलावं आणि कधी बोलू नये हे मला सांगणारी कोण?’ असा थेट सवालही त्यांनी विचारला. मी कधी बोलावं आणि कधी बोलू नये हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला (बुशरा अन्सारी) कोणी दिला? असं म्हणत त्यांनी बुशरा यांना बरंच सुनावलं.

मुस्लिम असल्यामुळे शबाना आझमी यांना मिळालं नव्हतं घर

पाकिस्तानी अभिनेत्रीच्या टिप्पणीवर जावेद अख्तर यांनी आपली बाजू मांडली. सुमारे 25 वर्षांपूर्वी त्यांची पत्नी शबाना आझमी यांना मुंबईत घर खरेदी करायचे होते. मात्र ब्रोकरने त्याना साफ सांगितलं की, घरमालक मुस्लिमांना घरे देत नाहीत, म्हणूनच शबाना यांना घर मिळालं नाही.घरमालकाने शबाना आझमींकडे माणूस म्हणून नव्हे तर मुस्लिम म्हणून पाहिलं हे दुर्दैवी होते, परंतु त्यांच्या निर्णयामागे एक अतिशय भावनिक कारण होते, असंही जावेद अख्तर म्हणाले.

पाकिस्तानमुळे लोकांच्या मनात कडवटपणा

‘ त्या मालकाने फ्लॅट विकण्यास नकार दिला कारण त्याचे पालक पाकिस्तानातील सिंधचे होते आणि त्यांना एका रात्रीत त्यांचा देश सोडून पळून जावे लागले. त्यांना बाहेर फेकण्यात आले. त्यांची जमीन, मालमत्ता, सामाजिक आदर, व्यवसाय, सर्वकाही त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. तो (घरमालक) निर्वासित म्हणून भारतात आला. त्याच्या मनात अजूनही ती वेदना होती; तो ते दुःख, ती कटुता विसरू शकला नव्हता.’ असं जावेद अख्तर यांन नमूद केलं.

पाकिस्तानमुळे सिंधी लोकांना सोडावा लागला आपला देश

जावेद अख्तर पुढे म्हणाले की, फाळणीनंतर पाकिस्तानातून पळून गेलेल्या अनेक सिंधी हिंदूंना त्यांचे जीवन पुन्हा सुरू करावे लागले. ‘हे तेच सिंधी आहेत, गरीब सिंधी, जे रस्त्यावर कपडे आणि चणे विकत असत. त्यांनी आपल्या मेहनतीने स्वतःचे स्थान निर्माण केले. पण त्यांचे काय झाले? ती कटुता अजूनही त्यांच्या आत जिवंत आहे ‘असंही अख्तर यांनी सांगितलं.

पाकिस्तानी लोकांनी सिंधी लोकांना एका रात्रीत त्यांच्या देशातून हाकलून लावले, त्यानंतर त्यांना भारतात निर्वासित म्हणून राहावे लागले आणि निर्वासितांचे जीवन खूप वेदनादायक होते. त्यांन लाखो लोकांसोबत छावणीत राहावे लागले आणि जेवणासाठीही लांबंच लांब रांगेत उभं राहावं लागायचे, असे ते म्हणाले.

जावेद अख्तर यांनी बुशरा अन्सारीला शिकवला धडा

ज्यांच्यावर इतक्या खोल जखमा आहेत ते मुंबईच्या त्या घरमालकासारखीच प्रतिक्रिया देतील ना. ज्यांनी त्या लोकांवर हे घाव घातले ते दुसरे तिसरे कोणी नव्हेत,पाकिस्तानीच आहेत. जर शबाना आझमींना भारतात घर मिळत नसेल तर त्यामागचं कारण म्हणजे, पाकिस्तान आणि पाकिस्तानींनी दिलेल्या जखमा असल्याचं अख्तर यांनी सुनावलं. पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी या ज्यांच्यावर घर न देण्याचा आरोप करत आहे, त्या लोकांना पाकिस्ताननेच दुखावलं आहे. म्हणून, कोणाकडेही बोट दाखवण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या आत डोकावून पाहिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.