AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaya Kishori | ‘द केरळ स्टोरी’वर जया किशोरी यांची मोठी प्रतिक्रिया; हिंदू राष्ट्राबाबतही मांडलं मत

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने आतापर्यंत 180 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केलं आहे. तर चित्रपटात अदा शर्मा, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी आणि योगिता बिहानी यांच्या भूमिका आहेत.

Jaya Kishori | 'द केरळ स्टोरी'वर जया किशोरी यांची मोठी प्रतिक्रिया; हिंदू राष्ट्राबाबतही मांडलं मत
Jaya Kishori on The Kerala StoryImage Credit source: Twitter
| Updated on: May 22, 2023 | 8:28 AM
Share

इंदौर : प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांचं भाषण आणि विविध मुद्द्यांवर त्यांनी मांडलेली मतं अनेकदा श्रोत्यांना प्रेरणा देतात. त्यांच्या भजनांना आणि प्रेरणादायी भाषणांना युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळतात. समाज, लग्न, धर्म अशा विविध विषयांवर जेव्हा त्या भाष्य करतात, तेव्हा त्याची चर्चा होते. नुकताच त्यांनी इंदौर दौरा केला. यावेळी त्यांनी वादग्रस्त ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाविषयी आपलं मत व्यक्त केलं. त्याचसोबत त्यांनी हिंदू राष्ट्र आणि राजकारण यांसारख्या मुद्द्यांवरही खुलेपणाने भाष्य केलं.

“प्रत्येक सनातनी व्यक्तीला हिंदू राष्ट्र हवा आहे”

हिंदू राष्ट्रबाबत जया किशोरी म्हणाल्या, “मी सनातनी असल्याने हिंदू राष्ट्र झाल्यास मला खूप आनंद होईल. सरकार याबाबत काय ते करेल, पण कायदा आणि सुव्यवस्था राखून गोष्टी झाल्या पाहिजेत. हिंदू राष्ट्र ही प्रत्येक सनातनीची इच्छा आहे.”

राजकारणाबाबत काय म्हणाल्या जया किशोरी?

राजकारण आणि धर्माविषयीच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की “धर्मात राजकारण आलं नाही पाहिजे. जर तुम्ही महाभारत पाहिलंत तर श्रीकृष्णने संपूर्ण महाभारतात फक्त राजकारणच केलं आहे. ते स्वत: लढू शकले असते. पण त्यांनी बसल्या-बसल्या सर्व कामं केली, राजकारण केलं. राजकारण वाईट नाही, जर ते श्रीकृष्णासारखं केलं तर. दुर्योधन यांनीसुद्धा राजकारण केलं होतं. कोणासारखं राजकारण करायचं, हे तुम्हाला ठरवायचं आहे.”

‘द केरळ स्टोरी’वरील प्रतिक्रिया

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू आहे. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मांतर केलं जातं, त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत कसं सामील केलं जातं याविषयीची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाविषयी जया किशोरी म्हणाल्या, “माझ्या मते नेहमीच ठराविक संदेश घेऊन चित्रपट बनवले जातात. मात्र तुम्हाला समजलं पाहिजे की कोणती गोष्ट मनोरंजन आहे आणि कोणती नाही. चित्रपट फक्त मनोरंजनासाठी पहावी. कोणत्या चित्रपटातील शिकवण आपण आपल्या जीवनात आत्मसात करावी एवढी बुद्धी आणि समज प्रत्येक व्यक्तीला असते. आपल्याला त्याचाच वापर करायचा आहे. मी नेहमीच म्हणते की तुम्ही चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. मी चित्रपट पाहिला आहे. तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे.”

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने आतापर्यंत 180 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केलं आहे. तर चित्रपटात अदा शर्मा, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी आणि योगिता बिहानी यांच्या भूमिका आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.