Pahalgam Attack : पहलगामचा हल्ला हे भारत सरकारचंच षडयंत्र; अभिनेत्रीच्या दाव्याने खळबळ

Pahalgam Attack : पहलगामचा हल्ला हे भारत सरकारचंच षडयंत्र... सोशल मीडियावर व्हायरल होत एक व्हिडीओ... अभिनेत्रीच्या धक्कादायक दाव्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

Pahalgam Attack : पहलगामचा हल्ला हे भारत सरकारचंच षडयंत्र; अभिनेत्रीच्या दाव्याने खळबळ
Pahalgam attack
| Updated on: Dec 17, 2025 | 11:25 AM

Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरमधील पहगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला. कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या भारतीयांना दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या… घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ माजली होती… दरम्यान, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम जया भट्टाचार्य पुन्हा चर्चेत आले आहेत. अभिनेत्रीचा एका जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने पहलगामचा हल्ला हे भारत सरकारचंच षडयंत्र… असं म्हटलं आहे…

व्हिडीओ पोस्ट करत जया भट्टाचार्य म्हणाली, ‘सुप्रीन कोर्टाच्या खांद्यावर ठेवून शिकार करत आहे… सरकारने आम्हाला सांगायला हवं नक्की कोणासोबत सुरु आहे व्यापार? आमच्या रस्त्यांवरील कुत्र्यांचा… दिल्लीत रस्त्यावरील कुत्र्यांसाठी निदर्शने करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही जितकी सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे तितकीच जर तिथे तैनात केली असती, जिथे लोकांनी नाव विचारुन मारलं… तर लोकांनी अशी हत्या झाली नाही… हे पण एक षडयंत्र आहे का? प्रश्न आहे… उत्तर द्या…’ असं आव्हान जया भट्टाचार्य हिने भारत सरकारला केलं.

 

 

जया भट्टाचार्य हिचा व्हायरल व्हिडीओ…

जया भट्टाचार्य हिचा आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ 2025 मधील आहे… ज्यामध्ये भारत सरकारवर टीका करण्यात आली आणि पहलगामचा हल्ला हे भारत सरकारचंच षडयंत्र आहे… असं म्हणण्यात आलं. सांगायचं झालं तर, अभिनेत्री प्राणीप्रेमी आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर प्राण्यांसाठी आवाज उठवताना दिसते… भटक्या कुत्र्यांविरुद्धच्या लढाईत ती विशेषतः सक्रिय असते.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काय म्हणालेली जया

ऑगस्ट 2025 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असा निर्णय दिला की दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होम पाठवलं जाईल आणि ते रस्त्यावर दिसू नयेत. अशात अनेक प्राणीप्रेमी सरकारच्या निर्णयाविरोधात होते. अभिनेत्री देखील सरकारच्या निर्णयाविरोधात होती… जया भट्टाचार्य कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.