कुत्र्याची सवय नडली… लग्नाच्या तीन वर्षात प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; इन्साईड स्टोरी काय?
एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट झाला आहे. पण त्याने पत्नीला ज्या कारणामुळे घटस्फोट दिला ते वाचून तुम्ही देखील चकीत व्हाल..

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अफेअर, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट या गोष्टींची बरीज चर्चा सुरु असते. काही कलाकारांचा संसार हा अनेक वर्षे टिकतो तर काहींचा २-३ वर्षात घटस्फोट होते. कधीकधी कलाकारांच्या घटस्फोटाला विवाहबाह्य संबंध कारणीभूत असल्याचे समोर येते. बरेचदा या कलाकार मंडळींच्या घटस्फोटाचं कारण हे त्यांच्यातील असमंजसपणा. मात्र एक अभिनेता आहे ज्याने लग्नाच्या तीन वर्षांमध्येच घटस्फोट घेतला आहे. पण या अभिनेत्याच्या घटस्फोटाचे कारण विवाहबाह्य संबंध नसून पाळीव प्राणी होते. आता नेमकं काय झालं होतं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत त्या अभिनेत्याचे नाव अरुणोदय सिंह आहे. त्याने १३ डिसेंबर २०१६ रोजी कॅनडाच्या ली एल्टनशी लग्न केले होते. त्यांचा विवाहसोहळा भोपाळ येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. परंतु लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अरुणोदय आणि ली एल्टन यांच्या घटस्फोटाचे कारण जेव्हा समोर आले तेव्हा सर्वजण चकीत झाले.
अरुणोदयला श्वानांची प्रचंड आवड आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील पाळीव श्वानांसोबत बरेच फोटो आहेत. जेव्हा अरुणोदयने ली एल्टनशी लग्न केले तेव्हा तो पाळीव श्वानांसोबत एकाच घरात राहात होता. घरातील हे पाळीव श्वान सतत भुंकत असत. या श्वानांच्या लढाई आणि आवाजामुळे अरुणोदयची पत्नी ली एल्टनला प्रचंड राग येत असे. त्यामुळे ती अरुणोदयला श्वानांना दूर ठेवण्यासाठी सांगत असे. पण श्वानांच्या आवाजामुळे अरुणोदय आणि ली एल्टनचे इतके मोठे भांडण झाले की दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.




अभिनेत्याने भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आणि २०१९ मध्ये त्याचा घटस्फोटही झाला. अरुणोदय सिंगच्या घटस्फोटाला आता अनेक वर्ष झाली आहेत परंतु त्यानंतर अभिनेत्याने पुन्हा लग्न केले नाही आणि वयाच्या ४२ व्या वर्षी तो एकटाच आहे.