AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंगीचं औषध देऊन अभिनेत्रीसोबत नको ते कृत्य; ‘जोरू का गुलाम’ सिनेमाच्या दिग्दर्शकाला अटक

'जोरू का गुलाम' या चित्रपटाचे दिग्दर्शक शकील नूरानी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका 33 वर्षीय अभिनेत्रीने त्यांच्याविरोधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.

गुंगीचं औषध देऊन अभिनेत्रीसोबत नको ते कृत्य; 'जोरू का गुलाम' सिनेमाच्या दिग्दर्शकाला अटक
Shakeel NooraniImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 09, 2026 | 12:13 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. आजवर अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचचे धक्कादायक आरोप केले आहेत. अशाच एका प्रकरणात ‘बडे दिलवाला’ आणि ‘जोरू का गुलाम’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्माते शकील नूरानी (73 वर्षे) यांना मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. एका 33 वर्षीय अभिनेत्रीने नूरानी यांच्याविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूरानी यांनी नवीन चित्रपटावर चर्चा करण्याच्या बहाण्याने संबंधित अभिनेत्रीला मालवणी इथल्या त्यांच्या घरी बोलावलं होतं. अभिनेत्री त्यांच्या घरी गेली असता त्यांनी तिला गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकंच नव्हे तर या घटनेचा खुलासा केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही नूरानी यांनी दिल्याचा आरोप पीडित अभिनेत्रीनं केला आहे.

नूरानी यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे नूरानी यांचा शोध घेतला. सातारा जिल्ह्यातील मेढा इथल्या एका फार्महाऊसमधून त्यांना शनिवारी 8 ऑगस्ट 2027 रोजी पहाटे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आलं. शकील यांना अटकेनंतर न्यायालयासमोर सादर केलं असता त्यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मालवणी पोलिसांनी शकील नूरानी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 64(2)(m), 123, 351(2) आणि 88 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहेत शकील नूरानी?

शकील नूरानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. 1999 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बडे दिलवाला’ आणि 2000 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘जोरू का गुलाम’ हे त्यांच चित्रपट विशेष गाजले. नूरानी यांनी 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विष्णू देवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘जोरू का गुलाम’ या चित्रपटात गोविंदा आणि ट्विंकल खन्ना यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब: द अॅसिड ऑफ लव्ह’ या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनीच केलं होतं. याप्रकरणी अद्याप शकील नूरानी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.

Follow Us
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप