AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खोलीत बोलावलं कपडे काढायला लावले, त्यानंतर तर…’, कहानी घर घर की फेम अभिनेत्रीचा अनेक वर्षांनंतर धक्कादायक खुलासा

'खोलीत बोलावलं कपडे काढायला लावले, त्यानंतर तर...', 'कहानी घर घर की' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीवर अशी वेळ आलेली, जेव्हा अभिनेत्रीला दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी कपडे काढायला सांगितलेले... आता अभिनेत्रीने यावर अनेक वर्षांनंतर धक्कादायक खुलासा केला आहे.

'खोलीत बोलावलं कपडे काढायला लावले, त्यानंतर तर...', कहानी घर घर की फेम अभिनेत्रीचा अनेक वर्षांनंतर धक्कादायक खुलासा
Shweta Kwatra
| Updated on: Jul 16, 2026 | 10:55 AM
Share

पूर्वी अभिनेत्री त्यांच्या आलेल्या वाईट अनुभवांबद्दल फार काही बोलत नव्हत्या, पण आता काळ बदलला आहे. अभिनेत्री आता त्यांच्यासोबत घडणाऱ्या चांगल्या – वाईट घटना सर्वांसमोर सांगत असतात. आता देखील ‘कहानी घर घर की’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर तिच्यासोबत घडलेली धक्कादायक प्रकार घटना सांगितली आहे. अभिनेत्रीने इंडस्ट्रीत होणाऱ्या महिलांवर अत्याचाराबद्दल असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वच हैराण झाले आहे. तिने सांगितलं की, ‘कास्टिंग काउच’मुळे तिला अत्यंत अपमानित वाटलेलं.’ अभिनेत्री श्वेता क्वात्रा हिने धक्कादायक खुलासा केला आहे.

तडजोड करण्यासाठी विचारायचे…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत श्वेता हिने फक्त कास्टिंग काऊचच नाही तर, मिडिल एजेंट आणि मिडिएटर यांच्यामुळे देखील अनेक गोष्टी व्हायच्या असं सांगितलं आहे. जे प्रचंड विचित्र होतं. ‘सुरुवातीला ते थेट तडजोड करण्यास सांगायचे. पण तेव्हा मला कळंच नाही की, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे… त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे अनुभव फार वेगळे होते. तडजोड म्हणजे काय असतं, हे एक मुलगी म्हणून समजून घेणं फार कठीण होतं.’

ऑडिशनमध्ये सांगितलं कपडे काढ..

पुढे अभिनेत्रीने धक्कादायक खुसाला केला. ‘एका हॉटेलमध्ये मी ऑडिशनसाठी गेलेली. तेथे जवळपास 60 – 70 मुली आणि अनेक मॉडेल्स देखील होत्या. त्यामुळे अवघड असं काहीही वाटलं नाही. आतमध्ये गेल्यानंतर दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते समोर बसले होते. त्यांनी मला विचारलं सर्वकाही वाचून घेतलं आहेस का. यावर मी होकार दिला. त्यानंतर त्यांनी मला चालायला सांगितलं. मी त्यांना चालून देखील दाखवलं… पण त्यानंतर त्यांनी मला अचानक मला सांगितलं, कपडे काढ… मला असं वाटलं माझ्या ऐकण्यात काही चुकी झाली असेल. पण त्यांनी पुन्हा सांगितलं, स्ट्रीप… स्ट्रीप…’

‘त्यावेळी एखाद्या मुलीला किती अपमानीत, राग आणि हेल्पलेस वाटलं असेल.. बाहेर देखील लोकं होती आणि आतमध्ये देखील.. पण फरक फार मोठा होता. ते मला पुढे म्हणाले, ‘आम्हाला तुला स्विमिंगसूटमध्ये पाहायचं आहे. तेव्हा माझ्या तोंडातून एक शब्द देखील बाहेर निघाला नाही. मी मोठ्या हिंमतीने त्यांना कारण विचारलं… पण त्यांचं उत्तर होतं, आम्हाला पाहायचं आहे. स्विम सूटमध्ये तू कशी दिसतेस… तेव्हा फक्त त्यांनी धन्यवाद म्हणाली आणि बाहेर निघून आली…’, असं देखील अभिनेत्री म्हणाली.

श्वेता क्वात्रा हिचे सिनेमे आणि शो…

सांगायचं झालं तर, श्वेता क्वात्रा हिला 2000 मध्ये प्रसारित झालेल्या ‘कहानी घर घर की’ मालिकेतून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. अभिनेत्री अनेक खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘कुमकुम: एक प्यारा सा बंधन’, ‘सीआईडी’ आणि ‘बालवीर’ यांसारख्या मालिकांमध्ये ती दिसली. एवढंच नाही तर, ‘मर्डर 2’, ‘राम सेतु’, ‘अजहर’ आणि ‘माय ब्रदर निखिल’ यांसारख्या सिनेमांमध्ये देखील श्वेता हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा