धर्मेंद्र यांच्या निधनाने काजोल भावुक; मुलगा युगसोबतचा त्यांचा फोटो पोस्ट केला अन्…

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. 'ही-मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मजींच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी भावूक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली.अभिनेत्री काजोलही त्यांच्या जाण्याने भावूक झाली. तिने तिच्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

धर्मेंद्र यांच्या निधनाने काजोल भावुक; मुलगा युगसोबतचा त्यांचा फोटो पोस्ट केला अन्...
Kajol emotional tribute to Dharmendra
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2025 | 3:28 PM

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते, माजी खासदार धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आज 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने नक्की सर्वांनाच धक्का बसला असून बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा त्यांच्या कुटुंबासह अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार उपस्थित होते. तसेच सर्व कलाकारांनी त्यांच्या अशा अचानक झालेल्या एक्झीटमुळे शोक, दु:ख व्यक्तकेलं आहे. अनेक कलाकार ते राजकीय मंडळींपर्यंत सर्वजण त्यांच्यासाठी भावूक पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.

काजोलची धर्मेंद्र  यांच्यासाठी भावूक पोस्ट

दरम्यान अभिनेत्री काजोलनेही भावूक पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्याबाबत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. काजोलने तिचा मुलगा युगसोबत धर्मेंद्र यांचा असलेला एक फोटो शेअर केला आहे आणि एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. काजोलने लिहिले आहे की, “एका चांगल्या माणसाचा ओजी गेला आहे आणि जग त्याच्यासाठी आणखी गरीब झाले आहे… असं वाटतंय की, आपण त्यात फक्त चांगल्याच माणसांना गमावत आहोत. मनाने नेहमीचे दयाळू आणि नेहमीच प्रेमळ राहिलेत. धर्मजींना श्रद्धांजली… नेहमीच प्रेमाने.” असं म्हणत तिने भावूक होत ही पोस्ट आणि धर्मेंद्र यांच्याबद्दल असणारं प्रेम, आदर तिने व्यक्त केला आहे.


300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम 

धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आदरणीय आणि लोकप्रिय स्टारपैकी एक होते. धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जायचे त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तब्बल एका वर्षात 70 पेक्षाही जास्त हीट चित्रपट देण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे आणि आतापर्यंत हा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलं नाही. ज्यात “शोले”, “चुपके चुपके”, “सीता और गीता” आणि “धरम वीर” सारखे सुपरहिट चित्रपट समाविष्ट होते. त्यांचे संवाद अजूनही मोठ्या प्रमाणात बोलले जातात. ज्यामध्ये “शोले” मधील त्यांचे डायलॉग तर आजही प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतात. किंवा मग त्यांची डान्स स्टाईल असो आजही ती कॉपी केली जाते.

धर्मेंद्र यांचा हा चित्रपट ठरला शेवटचा

धर्मेंद्र वयाच्या 89 व्या वर्षीही चित्रपटांमध्ये सक्रिय राहिले. त्यांनी “रॉकी ​​और रानी की प्रेम कहानी” आणि “तेरी बातें… में ऐसा उलझा जिया” या चित्रपटांमध्ये दिसले, जिथे त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना या वयातही मंत्रमुग्ध केले होते. आता ते अमिताभ यांचे नातू अगस्त्य नंदाच्या “21 किज” या चित्रपटात दिसणार आहेत. पण हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला, जो या वर्षी 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दुर्दैवाने, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच धर्मेंद्र यांचे निधन झाले.