AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त या एका गोष्टीसाठी काजोलने मोडला ‘नो किसिंग’चा नियम; म्हणाली “ते खूप अन्कम्फर्टेबल..”

'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये काजोलचा किसिंग सीन चांगलाच चर्चेत आला होता. कारण पडद्यावर कधीच किसिंग सीन करायचा नाही, असा तिचा नियम होता. मात्र या सीरिजसाठी तिने हा नियम मोडला होता. त्यामागचं कारण आता तिने सांगितलं आहे.

फक्त या एका गोष्टीसाठी काजोलने मोडला 'नो किसिंग'चा नियम; म्हणाली ते खूप अन्कम्फर्टेबल..
काजोलImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 24, 2026 | 8:49 AM
Share

अभिनेत्री काजोल जवळपास गेल्या तीन दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतेय. तिने आतापर्यंत ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2023 मध्ये काजोलने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं. ‘द ट्रायल- प्यार, कानून, धोखा’ या वेब सीरिजमध्ये तिने काम केलं होतं. ओटीटीवर पदार्पण करताच काजोलने तिची अनेक वर्षांपासूनची ‘नो किसिंग पॉलिसी’ मोडली होती. या सीरिजमधील अभिनेता जिशू सेनगुप्तासोबत तिचा किसिंग सीन चांगलाच चर्चेत होता. पडद्यावर कधीच किसिंग सीन करायचा नाही, हा काजोलचा नियम होता. मात्र या सीरिजसाठी तिने हा नियम का मोडला, याचं उत्तर खुद्द काजोलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलं आहे.

लिली सिंहच्या पॉडकास्टमध्ये बोलताना काजोल म्हणाली, “खरं सांगायचं तर, हा त्या सिझनचा विषय होता. त्या भूमिकेसोबत आणि ती नेमकी कशी आहे, हे पडद्यावर दाखवण्याबाबत बरंच काही करता येण्यासारखं होतं. तो फक्त साधा किस नव्हता, ती काय विचार करत होती आणि तिला काय करायचं होतं, तिच्यासाठी काय घडलं नव्हतं.. याबद्दल ते सर्वकाही होतं. तिचा कशावर विश्वास होता, कशावर श्रद्धा होती, कशावर नव्हती यासंदर्भात ते होतं. तो किसिंग सीन त्या सीरिजच्या संपूर्ण पटकथेचा महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे त्या भूमिकेतून मी तो भाग काढून टाकू शकत नव्हेत. ती त्या सीनची, त्या कथेची, त्या सीरिजची गरज होती.”

जेव्हा लिलीने तिला विचारलं की काजोलसुद्धा एक व्यक्ती म्हणून बदलली का, तर त्यावर उत्तर देताना ती पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की मी अन्कम्फर्टेबल होते. सेटवर उभं राहेपर्यंत माझ्यासाठी ते प्रचंड अन्कम्फर्टेबल होतं. मला थिअरीमध्ये ते आवडलं होतं आणि मी खरंच तो सीन करणार का याबद्दल मलाच खात्री नव्हती. कट, हे मी करणार नाही.. असं मी त्यांना बोलेन का, हेसुद्धा मला माहीत नव्हतं. पण तो फक्त एक सीन होता. प्रोफेशनल दृष्टीकोनातून तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि मला त्यावेळी असं वाटलं की मी आता तो निर्णय घेऊ शकते.”

या सीरिजमध्ये काजोलने नोयोनिका सेनगुप्ताची भूमिका साकारली होती, जी एक गृहिणी असते, परंतु पतीच्या स्कँडलनंतर ती कायदेक्षेत्रात पुन्हा परतते. या कोर्टरुम ड्रामाचं दिग्दर्शन सुपर्ण वर्माने केलं होतं.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच