AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुखने ‘पठाण’च्या कमाईचे खोटे आकडे सांगितले? काजोलच्या व्हिडीओवरून अभिनेत्याने साधला निशाणा

काजोलने जरी मस्करीत शाहरुखला हा सवाल केला असला तरी काही नेटकऱ्यांनी त्यावरून चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. ‘याचा अर्थ इंडस्ट्रीत प्रत्येकाला माहीत आहे की पठाणच्या कलेक्शनमध्ये काहीतरी गडबड नक्की आहे’, असं एकाने म्हटलं.

शाहरुखने 'पठाण'च्या कमाईचे खोटे आकडे सांगितले? काजोलच्या व्हिडीओवरून अभिनेत्याने साधला निशाणा
SRK and KajolImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 16, 2023 | 3:49 PM
Share

मुंबई | 16 जुलै 2023 : शाहरुख खानचा ‘पठाण’ हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वांत हिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल 1000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळालं. केवळ देशातच नाही तर परदेशातही हा चित्रपट गाजला. मात्र इंडस्ट्रीतील शाहरुखची खास मैत्रीण काजोलनेच या चित्रपटाच्या कमाईवर आता प्रश्न उपस्थित केला आहे. ‘शाहरुखच्या पठाणने खरंच किती कमाई केली’, असा सवाल तिने केला. यावरून आता एका बॉलिवूड अभिनेत्याने निशाणा साधला आहे. बॉलिवूडचा हा खरा चेहरा असल्याचा टोमणा या अभिनेत्याने मारला आहे.

‘द ट्रायल’ या सीरिजच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत काजोलला विचारण्यात आलं की जर तिला शाहरुखला एखादा प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तर ती कोणता प्रश्न विचारणार? त्यावर काजोल म्हणाली, “त्याला मी काय विचारणार? त्याचं सर्व काही सोशल मीडियावर स्पष्ट आहे.” त्यानंतर थोडा विचार करून काजोल मजेशीर अंदाजात पुढे म्हणते, “मी विचारेन की मला खरं खरं सांग की तुझ्या ‘पठाण’ या चित्रपटाने किती कमाई केली होती?” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. काजोलचा हाच व्हिडीओ शेअर करत आता कमाल आर. खानने बॉलिवूड इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे.

पहा व्हिडीओ

‘काजोलने पठाणच्या कमाईची खिल्ली उडवली आहे. याचा अर्थ अजय देवगण घरी तिच्याशी चर्चा करत असेल की शाहरुख खान कमाईचे बनावट आकडे सांगत आहे. बॉलिवूडचा हाच खरा चेहरा आहे’, असं ट्विट केआरकेनं केलं आहे. काजोलने जरी मस्करीत शाहरुखला हा सवाल केला असला तरी काही नेटकऱ्यांनी त्यावरून चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. ‘याचा अर्थ इंडस्ट्रीत प्रत्येकाला माहीत आहे की पठाणच्या कलेक्शनमध्ये काहीतरी गडबड नक्की आहे’, असं एकाने म्हटलं. तर ‘मलाही हाच संशय आहे की त्यात काहीतरी गडबड आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘धन्यवाद काजोल, तू आम्हाचा संशय खरा केलास’ असंही काहींनी म्हटलंय.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना