तब्बल 21 वर्षांनी शाहरुखचा ‘हा’ सिनेमा मोठ्या पडद्यावर री-रिलीज; एकेकाळी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलं होतं राज्य
सध्या अनेक जुने चित्रपटांचा रीरिलीजचा एकामागोमाग धडाका सुरु आहे. तब्बल 21 वर्षांनी शाहरूख खानचा एक चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये री-रिलीज होत आहे. एकेकाळी 'या' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर राज्य केलं होतं. आता प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

सध्या अनेक जुने चित्रपटांचा रीरिलीजचा एकामागोमाग धडाका सुरु आहे. ‘रहना है तेरे दिल मे’, ‘रॉकस्टार’, ‘करण अर्जुन’, ‘तुंबाड’ यासारखे सुपरहिट सिनेमे पुन्हा रिलीज झाले. आता अजून एक जूना चित्रपट रीरिलीज होणार आहे.
तब्बल 21 वर्षांनी सिनेमा मोठ्या पडद्यावर री-रिलीज
इतक्या वर्षांनी जुने चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी खरोखरंच एक आनंदाची गोष्ट आहे. यासाठी प्रेक्षक आवर्जून हे सिनेमे पाहायला चित्रपटगृहात जातही आहेत. या सिनेमांच्या यादीत आता ‘कल हो ना हो’ चाही समावेश झाला आहे. शाहरुख खानचा ‘कल हो ना हो’ पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
- Kal Ho Na Ho will be re-released
2003 साली आलेला शाहरुख खान, प्रिती झिंटा, सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘कल ना हो’ प्रेक्षकांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सिनेमाची गोष्ट, तसेच त्यातील गाणी तर प्रचंड हिट आहेत. सोनू निगमने गायलेलं सिनेमाचं ‘कल हो ना हो’ हे टायटल साँग आजही ठिकठिकाणी ऐकलं जातं.
चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक
या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक झालं. आता तब्बल 21 वर्षांनी हा सिनेमा पुन्हा रिलीज होत आहे. 15 नोव्हेंबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर भेटीला येत आहे. धर्मा प्रॉडक्शन्सने ट्वीट करत ही गुडन्यूज दिली आहे. ‘लाल अब सब के दिल का हाल है, होनेवाला अब कमाल है’ असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
- Kal Ho Na Ho will be re-released
‘कल हो ना हो’ सिनेमाला गेल्या वर्षी 20 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने करण जोहरने सिनेमाच्या अनेक आठवणी शेअर केल्या होत्या. निखिल अडवाणीने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.
चित्रपट पाहायला प्रेक्षकही उत्सुक
दरम्यान याबाबत करण जोहरने एक लांबलचक पोस्टही लिहिली होती. “हा चित्रपट माझ्यासाठी आणि कदाचित आपल्या सर्वांसाठी इतका भावनिक प्रवास आहे, जर मी अनेक वर्षांपासून एकत्र केले असेल तर. अशा उत्कृष्ट स्टारकास्टला एकत्र आणण्यासाठी उत्तम कथेसह… ‘कल हो ना हो’ अजूनही मजबूत आणि प्रत्येकाच्या हृदयात धडधडत असल्याबद्दल संपूर्ण कलाकार आणि कॅमेऱ्याच्या मागे असलेल्या टीमचे अभिनंदन.” असे कॅप्शन देऊन त्याने चित्रपटाच्या प्रेमाची पोस्ट शेअर केली होती.
- Kal Ho Na Ho will be re-released
करणने असेही म्हटले की, ‘कल हो ना हो’ त्याचे वडील म्हणजे यश जोहर यांचा शेवटचा चित्रपट धर्मा परिवारातील एक महत्त्वाचा भाग होता. दरम्यान हा चित्रपट आता पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार तसेच यातील ‘कल हो ना हो’ हे लोकप्रिय गाणे आणि शाहरूख खान आणि प्रिती झिंटाचा रोमान्स मोठ्या पडद्यावर पाहता येणार यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक आहेत.
