AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वत:ला बॉलिवूडचा बाप समजू नकोस..; सलमान खानवर भडकला निर्माता, डायरेक्ट भाईजानलाच चॅलेंज

अभिनेता सलमान खान आणि 'काला हिरण: द बॅटल फॉर लिगसी' या चित्रपटावरून सुरू असेला वाद काही शांत होण्याचं नाव नाही. या चित्रपटाबाबत नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली, मात्र ती आता 6 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निर्मात्याने सलमान खानवर निशाणा साधला.

स्वत:ला बॉलिवूडचा बाप समजू नकोस..; सलमान खानवर भडकला निर्माता, डायरेक्ट भाईजानलाच चॅलेंज
अभिनेता सलमान खान
| Updated on: Jul 02, 2026 | 9:53 AM
Share

‘काला हिरण : बॅटल फॉर लेगसी’ (Blackbuck: Battle for Legacy) हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. 1 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयातया चित्रपटाबाबत सुनावणी झाली आणि त्यानंतर ती 6 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली. अभिनेता सलमान खाननेही या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. यावरून बराच वाद सुरू असून आता निर्मात्याने थट सलमान खानवर टीका करत त्याला सुनाववलं आहे. एवढंच नव्हे तर हा चित्रपट जगभरातील 8000 चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित केला जाईल असा दावाही निर्मात्याने केलाय.

‘काला हिरण: बॅटल फॉर लेगसी’ (Kala Hiran: Battle for Legacy) या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी अभिनेता सलमान खानने न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या याचिकेत त्याने या चित्रपटाचे निर्माते आणि त्याशी संबंधित सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र सलमान खानने स्वतःला बॉलीवूडचा ‘बाप’ (father) समजणं थांबवावं; हा चित्रपट नक्कीच प्रदर्शित होईल, अशा शब्दांत निर्मात्याने सुनावणीनंतर इशारा दिला.

सलमान खानवर टीकास्त्र

सलमान खानच्या याचिकेवरील सुनावणीनंतर, निर्माता अमित जानी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्यावर जोरदार टीका केली. ‘सलमान खानला आज दिल्ली उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही आणि चित्रपटावर कोणतीही बंदीही घालण्यात आली नाही’, असं त्यांनी ‘ X ‘वर (आधीचे ट्विटर) माहिती देताना त्यांनी नमूद केलं. एवढंच नव्हे तर ‘ हे प्रकरण ६ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. त्यामुळे (सलमानने) स्वतःला बॉलीवूडचा ‘बाप’ म्हणवून घेतल्यामुळे ‘काला हिरण’ (Kala Hiran) या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवलं जाणार नाही; हा चित्रपट एकाच वेळी 8000 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल’असंही त्यांनी या ट्विटमधून सुनावलं.

सलमानचे प्रयत्न अयशस्वी

काला हिरण या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी अभिनेता सलमान खानने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या चित्रपटामुळे त्याची प्रतिमा मलीन होऊ शकते, असं त्याचं म्हणणं आहे. हा चित्रपट 1998 मधील कुख्यात ‘काळवीट’ (ब्लकबक) शिकार प्रकरणावर आधारित असल्याचा त्याचा दवा आहे. जरी चित्रपटात त्याचे नाव स्पष्टपणे कोठेही नमूद केलेले नसले, तरीही पोस्टर, प्रचाराचे साहित्य आणि निर्मात्यांनी दिलेले संकेत यांवरून असे सूचित होते की हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे, असंही सलमानचं म्हणणं आहे.

जेव्हा या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालं, तेव्हा सलमानच्या याचिकेत असं नमूद करण्यात आलं होतं की त्यातील पात्र त्याच्याशी खूप मिळतेजुळते होते; तसेच पोस्टरमध्ये त्या पात्राला ज्या प्रकारे हातात बंदूक घेऊन दाखवण्यात आलं होतं, त्यावरूनही सलमानच्या स्वतःच्या लूकची आठवण होत होती, असंही याचिकेत म्हटलं होतं. सुनावणीदरम्यान, जेव्हा न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे का, अशी विचारणा केली, तेव्हा प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही असं निर्मात्यांच्या वकिलांनी सांगितलं होतं.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान