राहायला घर नव्हते, घटस्फोटानंतर वणवण फिरण्याची वेळ; रणबीरसोबत काम केलेल्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा अनुभव

बॉलिवूडमधल्या एका अभिनेत्रीने घटस्फोटानंतर तिला काय संघर्ष करावा लागला याबद्दल सांगितले आहे. घटस्फोटानंतर तिला कोणीही घर द्यायलाही तयार नव्हतं तसेच प्रत्येक अभिनेत्याशी जोडलं गेलेलं नाव, अशा अनेक अडचणींचा सामना करत ही अभिनेत्री पुन्हा उभी राहिली. हे सर्व अनुभून तिने स्वत: सांगितले आहेत.

राहायला घर नव्हते, घटस्फोटानंतर वणवण फिरण्याची वेळ; रणबीरसोबत काम केलेल्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा अनुभव
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 5:45 PM

बॉलिवूडमध्ये घटस्फोट होणं हे काही नवीन नाही, पण त्यानंतर सेलिब्रिटी मात्र आपापल्या मार्गाने पुढे निघून जातात. पण असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांना घटस्फोटानंतर संघर्ष करावा लागला. त्यात एक अशी अभिनेत्री आहे जीचं बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान आहे. एका दिग्दर्शकासोबतच्या घटस्फोटानंतर तिचं आयुष्यच बदललं. आयुष्यात फक्त संघर्षच आल्याचे तिने सांगितले.

ती अभिनेत्री आहे कल्की कोचलीन. दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबतच्या घटस्फोटानंतर तिचं आयुष्यच उद्धवस्थ झाल्याचं कल्कीने सांगितलं. या सगळ्यांमधून पुन्हा उभं राहण्यासाठी तिला चांगलाच संघर्ष करावा लागला. अभिनेत्री कल्की कोचलीन ही नेहमीच चर्चेत असते. तिने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांत काम केलेलं आहे.तिच्या अॅक्टिंगच्या करिअरची सुरुवात 2009 साली देव डी या चित्रपटापासून झाली. त्यानंतर तिने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘एक थी डायन’ अशा अनेक चित्रपटांत काम केलं.

दरम्यान, 2011 साली तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर पुढच्याच दोन वर्षांत अनुराग कश्यप आणि कल्की यांचा घटस्फोट झाला. 2013 साली कल्की कोचलीन आणि अनुराग कश्यप यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर 2015 साली त्यांचा घटस्फोट मंजूर करण्यात आला. या घटस्फोटानंतर मात्र कल्कीच्या आयुष्यात खूप बदल झाले आणि या सर्वांना तिला एकटीने उभं राहावं लागल्याचं ती सांगते.

अनुराग कश्यपसोबत घटस्फोटानंतर झाल्यानंतर कल्कीला राहण्यासाठी घर हवं होतं. मात्र तिला कोणीही भाड्याने घर देत नव्हतं. कल्कीने एका पॉडकास्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.ती म्हाणाली “तुम्ही एकट्या महिला असाल आणि तुम्हाला मुंबईत घर हवे असेल तर तुम्हाला फार अडचण येते. तुम्हाला सहसा घर भाड्याने मिळत नाही. त्या काळात प्रत्येकाला माझ्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. पण मला घर देण्यास कोणीही तयार नव्हतं” असं ती या पॉडकास्टमध्ये म्हणाली.

तसेच कल्कीने अजून एका मुलाखतीत सांगितलं होतं की “घटस्फोटानंतर कोणत्याही पुरुषासोबत मी दिसल्यावर माध्यमामध्ये आम्ही डेट करत असल्याच्या चर्चा होत होत्या. मला अनेक अफवांचाही सामना करावा लागला. घटस्फोटानंतरच्या आयुष्यावर प्रश्न उपस्थित केले जायचे. करिअर आणि खासगी आयुष्यात समतोल कसा राखते यावियी विचारलं जायचं. किंबहुना काही शेजाऱ्यांनीही माझ्या पालकांना माझ्याविषयी असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती’, असही कल्कीने सांगितले.

दरम्यान, आता कल्की कोचलीन तिच्या आयुष्यात खूप पुढे गेली आहे. तिने गाय हर्शबर्ग याच्याशी 2024 मध्ये लग्न केलं. तिच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. तिला साफो नावाची मुलगीही आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.