44 वर्षांपूर्वी ‘हा’ सिनेमा पाहून जीव संपवत होते कपल, अखेर घ्यावा लागला मोठा निर्णय
Bollywood Love Story: 44 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'तो' सिनेमा, ज्यामुळे अनेक कपल्ने घेतला स्वतःला संपवण्याचा निर्णय, एका कपलने तर दगडावर..., अखेर निर्मात्यांना घ्यावा लागला मोठा निर्णय

Bollywood: दिग्दर्शक मोहित सुरी यांचा ‘सैय्यारा’ सिनेमा चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. कधी विचार देखील केला नसेल की, Gen Z क्रिस आणि वाणी यांच्या प्रेमकहाणीवर चाहते इतके वेडे होती. चित्रपटगृहातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुलं – मुली आणि कपल्स देखील सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. पण 44 वर्षांपूर्वी देखील असा एका सिनेमा प्रदर्शित झाला होता, जो पाहिल्यानंतर अनेक कपल्सनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
जो सिनेमा पाहिल्यानंतर कपल्सनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, त्या सिनेमाचं नाव आहे ‘एक दुजे के लिए’… 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक दुजे के लिए’ सिनेमाचं दिग्दर्शन बालाचंदर यांनी केलं होतं. याचा जोडप्यांच्या मनावर आणि विचारांवर इतका खोल परिणाम झाला की ते स्वतःला वासू आणि सपना समजू लागले. अनेक जोडप्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.
सांगायचं झालं तर, ज्याप्रमाणे ‘सैय्यारा’ सिनेमामुळे अहान पांडे आणि अनीत पड्डा एका रात्रीत स्टार झाले. तर त्याचप्रमाणे ‘एक दुजे के लिए’ सिनेमातून अभिनेते कमल हासन आणि अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. सिनेमात कमल हासन यांनी वासू तर रती यांनी सपना या भूमिकेला न्याय दिला होता. 44 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमा पुन्हा चर्चेत आला आहे.
‘एक दुजे के लिए’ सिनेमाची कथा तमिळ भाषिक वासू आणि उत्तर भारतातील सपना यांच्याभोवती फिरते. दोघेही गोव्यात शेजारी राहतात आणि त्यांना एकमेकांची भाषाही समजत नाहीत… पण वेळेनुसार सर्वकाही बदलतं. जेव्हा वासू आणि सपना प्रेमाचा सर्वांसमोर स्वीकार करतात तेव्हा दोघांचा घरात तणावग्रस्त वातावरण निर्माण होतं. सर्व प्रयत्न करूनही, जेव्हा कुटुंबातील सदस्य वासू आणि सपनाच्या लग्नाला सहमत नसतात, तेव्हा दोघे शेवटी आत्महत्येचा निर्णय घेतात.
2009 मध्ये, महाराष्ट्रातील कसारा येथील एका जोडप्याने कड्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. ते वेगवेगळ्या जातीचे होते आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या नात्याविरुद्ध होते. ज्यामुळे सिनेमा चर्चेत आला. सिनेमात सुपरहीट ठरला, पण निर्मात्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली.
कपल्स आत्महत्या करु लागल्यानंतर अनेक संघटनांनी निर्मात्यांसोबत बैठक घेतली आणि आत्महत्या थांबवता येतील यासाठी लोकांना समजावून सांगण्याचं आवाहन केलं. ‘एक दुजे के लिए’ हा 1981 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक होता. सिनेमा जवळपास 50 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला. पण सिनेमाने तेव्हा 10 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील क्लासिक सिनेमांमध्ये ‘एक दूजे के लिए’ सिनेमाची गणना होते.
