
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत ही तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक तिच्या विधानांमुळे चर्चेत येते. कंगना राणावत ही कायमच सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी कंगना राणावत ही खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तिची आई शेतामध्ये काम करताना दिसली.
कंगना राणावत ही कायमच सोशल मीडियावर स्पष्ट मत मांडताना दिसते. कंगना राणावत आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठा वाद हा बघायला मिळतो. जावेद अख्तर यांच्यावर कंगना राणावत हिने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जावेद अख्तर आणि कंगना राणावत यांच्यामधील वाद इतक्या जास्त वाढला की, सध्या कोर्टात हे प्रकरण सुरू आहे.
नुकताच कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी आणि जो बायडन यांच्या हातामध्ये ग्लास दिसत आहे.
कैसा कलियुग मनुष्य के सर पे नाच रहा है, जो की पशुओं के मास या रक़्त का आहार नहीं करता, जो कभी धूम्रपान या मदिरा सेवन नहीं करता ऐसे भले मानुष को नीचा दिखाया जा रहा है की पेग पकड़ कर हवा में घुमाना नहीं आता।
Alcohol is medically/clinically/ scientifically in every way proven to be…— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 12, 2023
यावेळी जो बायडन यांचे बोलणे ऐकून नरेंद्र मोदी हे हसताना दिसत आहेत. आता याच व्हिडीओची खिल्ली उडवली जात आहे. काहीही कळाले नाही की, नरेंद्र मोदी अशाप्रकारे हासतात असे ट्रोलर्स म्हणत आहेत. आता यावरच कंगना राणावत हिने समाचार घेत खडेबोल सुनावले आहेत. कंगना राणावत हिने शेअर केलेली पोस्ट तूफान व्हायरल होत आहे.
कंगना राणावत हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, हे असे कसे कलियुग जे माणसाच्या डोक्यावर नाचत आहे, जो जनावरांचे मांस खात नाही, जो कधीही धूम्रपान किंवा दारू पीत नाही. अशा चांगल्या माणसाचा असा अपमान होत आहे. मद्यपान मानवी व्यवस्थेसाठी वैद्यकीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या वाईट आहे. जो बायडन जमिनीवर बसून हाताने खाऊ शकतात का? नेटकऱ्यांना खडेबोल सुनावताना कंगना दिसली आहे.