Kangana Ranaut | कंगना राणावत आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये वाद वाढला?, अभिनेत्रीने पुन्हा केले आरोप, न्यायालयामध्ये
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत ही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते. गेल्या काही दिवसांपासून सतत कंगना राणावत आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये वाद बघायला मिळत आहे. इतकेच नाही तर यांचा वाद थेट कोर्टात गेला आहे.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि जावेद अख्तर यांच्यामधील वाद गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. इतकेच नाही तर कंगना राणावत आणि जावेद अख्तर यांचे प्रकरण थेट कोर्टामध्ये पोहचले आहे. कंगना राणावत हिने जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कंगना राणावत हिच्या आरोपांना सडेतोड उत्तर देताना कायमच जावेद अख्तर (Javed Akhtar) हे देखील दिसले आहेत. बरीच वर्षे झाले यांचा वाद सुरू असून हा वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीये. जावेद अख्तर यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप कंगना हिने केला. विशेष म्हणजे आता या प्रकरणाला बरीच वर्षे होत असून आरोप प्रत्यारोपाचे सत्र हे सातत्याने सुरूच आहे.
नुकताच आता जावेद अख्तर आणि कंगना राणावत यांच्या प्रकरणात अत्यंत मोठे अपडेट पुढे आले आहे. कंगना राणावत हिने जावेद अख्तर यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंटची थेट मागणी केली आहे. यामुळे आता हे प्रकरण अधिकच तापण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणाकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
कंगना राणावत हिने जावेद अख्तर यांच्या विरोधात पुन्हा एकदा कोर्टात अपील केले आहे. कंगना राणावत हिने मोठा दावा देखील केला आहे. जावेद अख्तर हे जाणूनबुजून कोर्टात हजर राहत नसल्याचे म्हणण्यात आले आहे. यामुळेच कंगना राणावत हिने जावेद अख्तर यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंटची मागणी केली आहे.
कंगना राणावत हिने मुंबईच्या अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात जावेद अख्तर यांच्या विरुद्ध गुन्हेगारी धमकी प्रकरणी जामीनपात्र वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली आहे. 5 आॅगस्ट रोजी जावेद अख्तर यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, कुटुंबातील सदस्याचे मेडिकलचे कारण देत जावेद अख्तर उपस्थित राहिले नाहीत.
जावेद अख्तर हे जाणूनबुजून करत असल्याचे कंगना राणावत हिच्या वकिलांचे म्हणणे आले. आता या प्रकरणात 8 आॅगस्ट रोजी सुनावणी केली जाणार आहे. या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आता यावेळी तरी जावेद अख्तर न्यायालयात हजर राहणार की नाही हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
