‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न, सासरच्यांवर केले गंभीर आरोप!

कन्नड ‘बिग बॉस 7’ची (Bigg Boss) स्पर्धक अभिनेत्री चैत्रा कोटूरने (Chaitra Kotoor) काल (8 एप्रिल) आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने घरातील फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न, सासरच्यांवर केले गंभीर आरोप!
चैत्रा कुटूर

मुंबई : कन्नड ‘बिग बॉस 7’ची (Bigg Boss) स्पर्धक अभिनेत्री चैत्रा कोटूरने (Chaitra Kotoor) काल (8 एप्रिल) आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने घरातील फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता (Kannada Bigg Boss 7 Fame Chaitra Kotoor tries to commit suicide).

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपण लग्न केले असल्याचे जाहीर केले. कर्नाटकातील मांड्या येथील व्यापारी नागार्जुनबरोबर तिने लग्नगाठ बांधली होती. मात्र, त्यांचे लग्न झाल्यावर नागार्जुनचे कुटुंब तिला सून म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते.

गेल्या महिन्यात 28 मार्च रोजी चैत्रा यांच्या नागार्जुनबरोबरच्या लग्नाची काही छायाचित्रे व्हायरल झाली होती. ज्यामध्ये दोघेही मंदिरात लग्न करताना दिसले होते. या लग्नात त्याच्या कुटुंबातील सदस्यांनीही भाग घेतला होता. पेशाने व्यावसायिक असणाऱ्या नागार्जुनशी ती बर्‍याच वर्षांपासून नात्यात होती.

कुटुंबाने दिला त्रास

पोलिसांनी दिलेल्या निवेदनात चैत्रा यांनी म्हटले आहे की, आमच्या लग्नानंतर आम्ही नागार्जुनच्या वडिलोपार्जित घरात गेलो होतो. जिथे त्याच्या कुटुंबियांनी आम्हाला घरात येण्याची परवानगी दिली नाही आणि त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी असेही म्हटले आहे की, कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला बेकायदेशीरही म्हटले होते.

चैत्रा सांगतात की, त्यांच्या कुटूंबाच्या दबावामुळे नागार्जुन लग्न करण्यास तयार होत नव्हते आणि त्यांनी हे लग्न बराच काळ थांबवून ठेवले होते. पण, चैत्रा यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने आणि काहींनी मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न पार पडले. त्यानंतर चैत्रा यांना नागार्जुनच्या कुटुंबीयांनी स्वीकारले नाही आणि त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली (Kannada Bigg Boss 7 Fame Chaitra Kotoor tries to commit suicide).

जीवे मारण्याची धमकी

नागार्जुनच्या कुटुंबीयांनी त्यांना जिवे मारण्याचीही धमकी दिली असल्याचा सनसनाटी आरोप चैत्रा यांनी केला आहे. कुटुंबीयांनी त्यांच्यावर दबाव आणला की, त्यांनी नागार्जुन सोडले नाही, तर ते त्यांची बदनामी करतील आणि त्यांना शांततेने जगू देणार नाहीत.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी दोन्ही कुटूंबियांची जबाब नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रकरणात हाय प्रोफाईल असल्याने पोलीस घाईघाईत काहीही गोष्टी करणे टाळत आहेत. पोलीस ही केस कौटुंबिक भांडण म्हणून विचारात घेत आहेत आणि चैत्राला आत्महत्येस भाग पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केला, याचा तपास सुरू आहे.

बिग बॉसने दिली ओळख

चैत्राने कन्नडच्या ‘बिग बॉस 7’मध्ये भाग घेतला होता, ज्याचे सूत्रसंचालन किचा सुदीप याने केले होते. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी चैत्रा पटकथा लेखिकही होती आणि ‘हरीप्रिया सुजीदारा’ या चित्रपटात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिकाही देखील साकारली होती.

(Kannada Bigg Boss 7 Fame Chaitra Kotoor tries to commit suicide)

हेही वाचा :

New Wink Sensation | प्रियानंतर पूजा हेगडेनेही मिचकावला ‘डोळा’, काही तासांतच व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ!

The Bigg Bull | अभिनय क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना जोरदार चपराक, सोशल मीडियावर होतेय अभिषेक बच्चनची वाहवा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI