Kantara Chapter 1 Box Office: 125 कोटींमध्ये बनलेल्या चित्रपटाने 3 दिवसांतच केला बजेट वसूल, ‘कांतारा- चाप्टर 1’ची छप्परफाड कमाई
Kantara Chapter 1 Box Office: राष्ट्रीय पुरस्कार विजेता ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाने पुन्हा एकदा कमाल केली आहे. अवघ्या तीन दिवसांतच 'कांतारा- चाप्टर 1'ने बजेटची संपूर्ण रक्कम वसूल केली आहे. रविवारी कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Kantara chapter 1 Box Office Collection : दिग्दर्शन क्षेत्रातही ऋषभ शेट्टीला सर्वोत्तम का मानलं जातं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. राहिली गोष्ट अभिनयाची, तर त्यावर कोणी प्रश्न उपस्थित करू शकत नाही. ‘कांतारा : चाप्टर 1’ या चित्रपटात पुन्हा एकदा त्याचं दमदार परफॉर्मन्स पहायला मिळालं. इतकंच नव्हे तर कमाईच्या बाबतीतही अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 50 कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचला होता. आता या चित्रपटाने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
‘कांतारा : चाप्टर 1’मध्ये फक्त ऋषभ शेट्टीच नव्हे तर इतर कलाकारांनी उल्लेखनीय अभिनय केला आहे. यामध्ये रुक्मिणी सावंत आणि गुलशन देवैया यांचा समावेश आहे. प्रत्येक कलाकाराचं दमदार अभिनय या चित्रपटाला आणखी खास बनवतंय. या चित्रपटाच्या तगड्या कमाईचं कारण सर्वांत आधी तर ऋषभ शेट्टीच आहे. बॅकग्राऊंड म्युझिकपासून, स्क्रीनप्ले आणि व्हीएफएक्सपर्यंत अनेक बाबींवर ‘कांतारा: चाप्टर 1’ खरा ठरला आहे.
ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : चाप्टर 1’च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आल आहे. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने पहिल्याच शनिवारी 55.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाने फक्त भारतातच तीन दिवसांत 163.1 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. रविवारी कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यत आहे. त्यानंतर ‘वीक डेज’ची परीक्षा सुरू होईल. या सर्वांत आणखी एक खास गोष्ट म्हणजे, हिंदीत या चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ होत आहे.
‘कांतारा : चाप्टर 1’ची कमाई-
पहिला दिवस- 61.85 कोटी रुपये दुसरा दिवस- 46 कोटी रुपये तिसरा दिवस- 55.25 कोटी रुपये
163 कोटी रुपयांनंतर आता पुढचं टारगेट 200 कोटी रुपयांचं आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने बजेटची रकमसुद्धा वसूल केली आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया आणि प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित झाला आहे.
‘कांतारा : चाप्टर 1’ची हिंदी भाषेतील कमाई-
पहिला दिवस- 18.5 कोटी रुपये दुसरा दिवस- 12.5 कोटी रुपये तिसरा दिवस- 19 कोटी रुपये
