AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kapil Sharma Show : पुन्हा बंद होणार कपिल शर्मा शो? कधी प्रसारित होणार शेवटचा एपिसोड

'द कपिल शर्मा शो' बंद झाल्यानंतर प्रेक्षकांचं पोट धरुन हासणं होणार बंद? शोबद्दल मोठी अपडेट समोर... कपिल गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांना पोट धरुन हासवण्याचं काम करत आहे, पण आता...

The Kapil Sharma Show : पुन्हा बंद होणार कपिल शर्मा शो? कधी प्रसारित होणार शेवटचा एपिसोड
| Updated on: Apr 15, 2023 | 4:27 PM
Share

मुंबई : आतापर्यंत छोट्या पदद्यावर अनेक कॅमेडी शो प्रसारित झाले. पण ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) ने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. असंख्य चाहते कपिलच्या विनोदबुद्धीचं कायम कौतुक करत असतात. सोशल मीडियावर देखील शोचे छोटे आणि जास्त विनोदी व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. ‘द कपिल शर्मा शो’मुळे विनोदवीर कपिल शर्मा याला झगमगत्या विश्वात खरी ओळख मिळाली. कपिलच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कपिल गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांना पोट धरुन हासवण्याचं काम करत आहे. आलेल्या थकव्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’ पाहिल्यानंतर दिवसभरात आलेला तणाव कमी होतो. ‘द कपिल शर्मा शो’ कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो.

टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’चा तीसरा सीझन ऑफएयर झाल्यानंतर चाहते प्रचंड निराश झाले होते. पण २०२२ मध्ये शो पुन्हा नव्याने सुरु झाला. लवकरच कपिल शर्मा शोचा नवीन सीझन देखील बंद होऊ शकतो. अशी चर्चा जोर धरत आहे. कपिल द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून लोकांना हसवण्यासाठी ओळखला जातो.

महत्त्वाचं म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’ टीआरपीच्या यादीतही अव्वल आहे. या शोचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे तुम्ही देखील ‘द कपिल शर्मा शो’चे चाहते असाल तर तुम्हाला देखील निराश कराणारी ही बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द कपिल शर्मा शो’च्या निर्मात्यांनी शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे निर्मात्यांनी एवढा मोठा निर्णय का घेतला याचं कारण अद्याप समोर येवू शकलेलं नाही.

जूनपर्यंत शोला निरोप देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. जर निर्मात्यांनी असं केलं तर वर्षाच्या मध्यापर्यंत ‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘द कपिल शर्मा शो’बद्दल सांगायचं झालं तर, शोचा पहिला एपिसोड २३ एप्रिल २०१६ रोजी सुरु झाला होता. ज्यानंतर चार सीझन कपिलने त्याच्या सहकार्यांसोबत मिळून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

सांगायचं झालं तर, ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सेलिब्रिटी सहभागी व्हायचे. शिवाय आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी देखील सेलिब्रिटी हजेरी लावायचे. नुकताच अभिनेता सलमान खान त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये होता. यावेळी त्याच्यासोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव जुयाल यांच्यासोबत इतर सेलिब्रिटी देखील उपस्थित होते.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.