
मुंबई : रॉकी और रानी की प्रेम कहानी हा करण जोहर (Karan Johar) याचा चित्रपट मोठा जलवा करताना दिसला. विशेष म्हणजे रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाने धमाका केला. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाने तब्बल 150 कोटींची कमाई केली. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह हे मुख्य भूमिकेत दिसले. विशेष म्हणजे राहा हिच्या जन्मानंतर आलिया भट्ट हिने रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाची शूटिंग कश्मीर येथे केली.
रॉकी और रानी की प्रेम कहानी हिट ठरला. मुळात म्हणजे रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळाली. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलाय. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले. करण जोहर हा सध्या चर्चेत आहे.
नुकताच करण जोहर याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना करण जोहर हा दिसलाय. करण जोहर हा थेट म्हणाला की, रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटासाठी मी दोन निर्देशकांना कॉपी केले. संजय लीला भन्साळी आणि दिवंगत यश चोप्रा या दोघांना मी कॉपी केले. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या यशावर हे बोलताना करण जोहर दिसला.
आता करण जोहर याचा हा खुलासा ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये करण जोहर या थेट रणबीर कपूर याची पोलखोल करताना दिसला. करण जोहर याने सांगितले की, रणबीर कपूर याच्याकडे कोणीही पीआर नाहीये. इतकेच नाही तर त्याच्याकडे मॅनेजर देखील नाहीये.
रणबीर कपूर हा प्रत्येक गोष्ट स्वत: करतो. जर त्याला चित्रपटासाठी आपण तारीख मागण्यासाठी गेलो तर तो त्याचा मोबाईल काढतो आणि या तारखेला तो नेमका कुठे बिझी आहे हे सांगतो. यासोबतच करण जोहर हा रणबीर कपूर याचे काैतुक करताना दिसला. करण जोहर म्हणाला की, रणबीर कपूर हा खूप जास्त मेहनती व्यक्ती आहे.