प्रेमाचे किस, हातात हात; करीना अन् सैफनं बीचवर लुटला रोमॅंटिक डेटचा आनंद
करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचे रोमँटिक व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बीचवर घालवलेल्या सुट्टीचे फोटोमध्ये त्यांचे प्रेम आणि रोमान्स स्पष्ट दिसून येत आहे. करिनाने एका फोटोला "दिवाळीचा सनसेट माझ्या प्रेमासोबत" असे कॅप्शन दिले आहे.

बॉलिवूडचे रोमॅंटिक कपल म्हणजे करीना आणि सैफ सध्या सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. त्यांचे रोमॅंटीक फोटो पाहून चाहत्यांनी ही म्हटल आहे की,” रबने बना दी जोडी”. बेबो म्हणजेच सर्वांची आवडती बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या पती आणि मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी परदेशी गेली आहे.
करीना अन् सैफचा रौमँटिक अंदाज
बेबो म्हणजेच सर्वांची आवडती बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या पतीसोबत व्हॅकेशनचा आनंद लुटत आहे. ‘सैफीना’ने कामातून वेळ काढून सुट्टी एन्जॉय करतानाचे काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये करीना आणि सैफचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये सैफ आणि करीना एकमेकांसोबत ‘क्वालिटी टाइम’ घालवताना दिसत आहेत. एकमेकांना प्रेमाची मिठी मारत रोमॅंटिक होताना दिसत आहेत.
- Kareena Kapoor and Saif Ali Khan’s romantic date
एका फोटोमध्ये सैफ आपली पत्नी करीनाला प्रेमाने कपाळावर किस करताना दिसत आहे. तसेच एका फोटोमध्ये दोघेही सनसेटचे सुंदर दृश्य पाहत एकमेकांकडे बघत आहे, या फोटोला करीनाने कॅप्शनही दिलं आहे “दिवाळीचा सनसेट माझ्या प्रेमासोबत”. सैफ आणि करीनाच्या या सर्वच फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुलाडेत आहे असचं दिसून येत आहे.
View this post on Instagram
फोटोंना चाहत्यांची साथ
करीना आणि सैफचे हो रोमॅंटिक फोटो चाहत्यांनाही आवडले असून अनेक कमेंटस् केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की “तुम्ही दोघे सोबत खूप छान दिसता”, तर एकाने लिहिले आहे ” तुम्ही माझे फेव्हरेट कपल आहात”. तर अनेकांनी हार्टच्या इमोजी पाठवत आपली प्रतिक्रिया दिली आहे. चाहत्यांनाही सैफिनाचा हा रोमँटिक अंदाज फारच आवडला आहे.
- Kareena Kapoor and Saif Ali Khan’s romantic date
सिंघम अगेनमधून करीना प्रेक्षकांचे मनोरंजन
करीनाच्या कामाबद्दल बोलायचं झाले तर ती ‘सिंघम अगेन’ मध्ये वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट १ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचे या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
