
Kareena Kapoor Khan Cryptic Post: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिच्यासाठी मागचे काही दिवस मुळीच चांगले नव्हते. अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी धक्कादायक घटनेचा सामना केला. करीनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्लेखोराने प्राणघातक हल्ला केला. आता सैफ याची प्रकृती स्थिर असून, कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सैफ आणि करीना यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. सैफ याच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना करीना कपूर हिने केलेली क्रिप्टिक पोस्ट सध्या तुफान चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीनाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर करीना हिने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘लग्न, घटस्फोट, चिंता, बाळाचा जन्म आणि मुलांसाठी विचार… यांसारख्या गोष्टी जोपर्यंत आपल्यासोबत घडत नाहीत, तोपर्यंत त्यो गोष्टी आपल्याला समजत नाहीत…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जीवनातील परिस्थितींबद्दल बनवलेले नियम आणि गृहीतके नेहमीच बरोबर नसतात. आपण समजतो की आपण सर्वात समजदार आहोत, पण जेव्हा वेळ येते तेव्हा आयुष्य आपल्याला खूप काही शिकवतं…’ सध्या करीनाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर देखील करीना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, सर्वांना गोपनियतेचा आदर करण्याची विनंती केली होती. ‘कुटुंबासाठी हा खूप कठीण दिवस होता आणि आम्ही अजूनही त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.’ असं अभिनेत्री म्हणाली होती.
16 जानेवारी मध्यरात्री सैफ अली खान याच्या घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्यावर हल्ला केला. त्यानंतर आरोपील ठाणे येथून अटक करण्यात आली. सध्या याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. हल्ल्यानंतर सैफ याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हल्लेखोराने अभिनेत्याच्या मणक्यात वार केल्यामुळे सैफची शस्त्रक्रिया करावी लागली. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. शिवाय त्याने कामाला देखील सुरुवात केली आहे.