IIFA Awards:लाल टिकली, लाल साडी; पतौडी घराण्याची सून करीनाचा शाही लूक; सर्वांच्या नजरा खिळल्या
आयफा अवॉर्ड्समध्ये करीना कपूरच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. तिने नेसलेल्या लाल आणि सोनेरी रंगाच्या डिझायनर साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिचा साधा पण स्टायलिश लूक आणि हलका मेकअप तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होता.

या वर्षीचं आयफा अवॉर्ड्स खासच राहिलं सर्व कलाकारांनी अगदी आवर्जून हजेरी लावली. तसेच प्रत्येकजण खास लूकमध्ये आलेले पाहायला मिळाले. अख्खं बॉलिवूड एकाच मंचावर अवतरलं होतं. 69 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण जोहर आणि मनीष पॉल यांनी केलं. या भव्य बॉलिवूड सोहळ्यात वरुण धवन, जान्हवी कपूर आणि करीना कपूर खान सारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सर्व स्टार्स अतिशय सुंदर पोशाख घालून शोमध्ये आले होते. पण यावेळी करीना कपूरच्या देसी अवताराने सर्वांचंच मन जिंकलं. अभिनेत्री लाल रंगाची साडी घालून पुरस्कार सोहळ्यात पोहोचली. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
करीना कपूरचा खास लूक
अभिनेत्री करीना कपूरने पुरस्कार सोहळ्यासाठी लाल आणि सोनेरी रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती. या साडीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. साडीवर मोठे फुलांचे ठिपके होते. हे पॅच साडीची शोभा वाढवत होते. साडीवरील सोनेरी बॉर्डर देखील खुलून दिसत होती.
करीना कपूरने ही सुंदर साडी लाल ब्लाउजसोबत नेसली होती. ज्याची रचना खूपच सुंदर करण्यात आली होती. त्यावर करीनाने हॉल्टर नेक डिझाइन असलेला ब्लाउज घातला होता. ब्लाउजची मागची डिझाईनही वगेळ्या स्टाइलची होती. हा ब्लाउजची नॉट डिझाइन सुंदर वाटत होती. या ब्लाउज डिझाइनमुळे, करीना कपूरच्या देसी लूकला एक बोल्ड टचही होता.
View this post on Instagram
साधे दागिने अन् बोल्ड टच
करीना कपूरने या लाल रंगाच्या डिझायनर साडीसोबत फक्त कानातले घातले होते. जे त्याला एक सुंदर लूक देत होते. कानातल्यांव्यतिरिक्त, करीनाने इतर कोणतेही अॅक्सेसरीज घातली नव्हती. तिचा मेकअप आणि हेअरस्टाईल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
मेकअप आणि हेअरस्टाईलने लूक खास बनवला
करीना कपूरने तिच्या केसांचा एक साधा अंबाडा बनवला होता. पण तो लूकही अतिशय आकर्षक वाटत होता. करीनाने मेकअपही खूप हलका केला होता. तिचा मेकअप आकर्षक ठेवण्यासाठी तिने डोळ्यांत काजळ आणि ओठांवर न्यूड शेडची लिपस्टिक लावली होती. या लूकमध्ये बेबोने सर्वांचचं लक्ष आपल्याकडे खेचलं होतं.
