AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करीनाने नाकारलेल्या या 6 ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे अमिषा- प्रियांका बनल्या सुपरस्टार, जाणून घ्या कोणते होते ते चित्रपट ?

करीना कपूर खान ही एक उत्तम अभिनेत्री आहे यात वाद नाही. अनेक भूमिका तिने उत्तम साकारत अजरामर केल्या. पण तिने असे अनेक चित्रपट नाकारले जे पुढे खूप हिट ठरले व त्यात काम करणाऱ्या अभिनेत्रींचेही खूप कौतुक झाले. काहींना तर त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

करीनाने नाकारलेल्या या 6 ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे अमिषा- प्रियांका बनल्या सुपरस्टार, जाणून घ्या कोणते होते ते चित्रपट ?
Image Credit source: instagram
| Updated on: May 29, 2023 | 4:20 PM
Share

नवी दिल्ली : बॉलीवूडमध्ये, करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) ‘3 इडियट्स’ आणि ‘जब वी मेट’ सारख्या अनेक आयकॉनिक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की या अभिनेत्रीने बॉलिवूडचे असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटही नाकारले आहेत, ज्यामुळे अनेक अभिनेत्रींचे नशीब उंचावले. आज आम्ही तुम्हाला अशाच 6 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना करीनाने नकार दिला होता पण त्यात काम केल्याने इतर अभिनेत्रींचे नशीब फळफळले.

ब्लॅक

संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटात राणी मुखर्जी नव्हे तर करीना कपूर मिशेलची भूमिका साकारणार होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याआधी ही ऑफर फक्त करीनालाच देण्यात आली होती. पण त्यावेळी बच्चन कुटुंबाशी असलेल्या खराब संबंधांमुळे ती चित्रपटापासून दुरावली आणि तिने ही भूमिका नाकारल्याचं बोललं जातं. मात्र, नंतर राणी मुखर्जीने या व्यक्तिरेखेला अजरामर केले.

कहो ना प्यार है

करिअरच्या सुरुवातीला करीना कपूरने अशा ब्लॉकबस्टर चित्रपटाला नकार दिला होता, ज्यामध्ये नंतर दोन नवोदित कलाकार दिसले. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट असूनही संस्मरणीय ठरला. तो होता हृतिक रोशन आणि अमिषा पटेलचा ‘कहो ना प्यार है’ चित्रपट. यापूर्वी या चित्रपटात करीना कपूर दिसणार होती. मात्र आईच्या सांगण्यावरून तिने हा चित्रपट नाकारला.

हम दिल दे चुके सनम

तुम्हाला हे जाणून विचित्र वाटेल, पण करीना कपूरला आधी ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट ऑफर होणार होत. 1999 मध्ये करिनाने या चित्रपटासाठी नकार दिला कारण ती खूपच लहान होती. तसेच तेव्हा ती परदेशात शिक्षणासाठी जात होती. त्यानंतर हा चित्रपट ऐश्वर्याला मिळाला आणि तिच्यासाठी तो किती यशस्वी ठरला हे तर तुम्हाला आठवत असेलच.

क्वीन

कंगनाच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपट आहे ‘क्वीन’, या चित्रपटाने तिला स्टार बनवले. कंगनाने ‘गँगस्टर’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली, तिला ओळखही मिळाली. मात्र ‘क्वीन’ चित्रपटातूनच तिच्या करिअरला गती मिळाली. हा चित्रपट करीनाला ऑफर करण्यात आला होता, मात्र ही भूमिका तिला शोभणार नाही, असे वाटल्याने बेबोने त्यावेळी हा मोठा चित्रपट नाकारल्याचे बोलले जाते. पुढे कंगनाला यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

दिल धडकने दो

झोया अख्तरचा ‘दिल धडकने दो’ देखील करिनाला यापूर्वी ऑफर झाला होता पण तिने हा चित्रपट नाकारला होता. यासाठी करीनाने एक साधे कारण दिले की, तिला 90 दिवस क्रूझवर आऊटडोअर शूट करावे लागले. करीना म्हणाली की, तिने आता इंडस्ट्रीत स्वत:साठी एक स्थान निर्माण केले आहे आणि लोकांनी तिच्या गरजेनुसार जुळवून घेतले पाहिजे.

फॅशन

मधुर भांडारकरचा ‘फॅशन’ हा चित्रपट आजही लोक विसरलेले नाहीत. या चित्रपटात प्रियंका चोप्राने मेघना नावाच्या मॉडेलची व्यक्तिरेखा इतकी सुंदर साकारली होती की तिला यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. मात्र, मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’ या चित्रपटासाठी करिनाची पहिली पसंती होती. मात्र तारखांच्या समस्येमुळे तिने तो चित्रपट नाकारला होता.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.