Sunjay Kapur Death : मृत्यूपूर्वी दु:खी होता करिश्माचा माजी पती, शेवटच्या पोस्टमध्ये संजयने काय लिहीलं ?
Sunjay Kapur Death : उद्योगपती संजय कपूर याचे वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती असल्याने संजय अनेकदा चर्चेत होता. निधनानंतर संजय कपूर याची शेवटची सोशल मीडिया पोस्ट बरीच व्हायरल होत आहे. मृत्यूपूर्वी त्याने शेवटच्या पोस्टमध्ये काय लिहीलं होतं ?

90 च्या दशकातील नामवंत अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा माजी पती आणि बिझनेसमन संजय कपूर (Sunjay Kapur Death) याचा काल दुर्दैवी मृत्यू झाला. पोलो खेळत असताना काल त्याने इंग्लंडमध्ये शेवटता श्वास घेतला. संजय हाँ क्लबमध्ये पोलो खेळत होता आणि त्याच दरम्यान तो अचानक जमिनीवर पडला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही ते त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. रुग्णालयातच त्याने अखेरचा श्वास घेतला. करिश्माचा माजी पती असलेल्या संजयला पोलो खेळण्याची खूप आवड होती. दरम्यान त्याच्या निधनानंतर संजयची सोशल मीडियावरील एक शेवटची पोस्ट खूप चर्चेत आली असून ती व्हायरल होत आहे.
संजय कपूर याच्या आकस्मिक निधनाने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण कुटुंब सध्या शोकविव्हल आहे. दरम्यान मृत्यूच्या काही तासांपूर्वीतच संजयने त्याच्या एक्स ( पूर्वीच ट्विटर) अकाउंटवर एक ट्विट केले होते, जे आता सगळीकडे व्हायरल झालं आहे. काल दुपारी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताचा उल्लेख संयने या पोस्टमध्ये केला होता. त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहत त्याने शोक व्यक्त केला. “अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची दुःखद बातमी आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. या कठीण काळात देव त्यांना शक्ती देवो.” असं त्याने पोस्टमध्ये लिहीलं होतं.
Terrible news of the tragic Air India crash in Ahmedabad. My thoughts and prayers are with all the families affected. May they find strength in this difficult hour. 🙏 #planecrash
— Sunjay Kapur (@sunjaykapur) June 12, 2025
करिश्मा -संजयचा घटस्फोट
त्याच्या काही वेळानंतरच संजयचाही अचानक मृत्यू झाला. त्यामुळे आता त्याचं हे ट्विट संपूर्ण इंटरनेटवर व्हायरल होत आहे. संजय हा त्याची माजी पत्नी, अभिनेत्री करिश्मा कपूरमुळे चर्चेत असायचा. संजय आणि करिश्मा यांचे 2003 मध्ये लग्न झाले. त्यांच्या लग्नाला हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सनीही हजेरी लावली होती. त्यांना समायरा आणि कियान अशी दोन मुलंही आहेत. मात्र 2014 साली करिश्मा कपूरने हे नाते संपवण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
संजयवर गंभीर आरोप
त्यानंतर 2016 साली संजय आणि करिश्माचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर करिश्माने तिच्या दोन्ही मुलांना स्वतःच वाढवण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटादरम्यान करिश्माने संजयवर अनेक गंभीर आरोपही केले. त्या काळात त्यांच्या घटस्फोटाचीही खूप चर्चा झाली. काही वर्षांनी, संजयने प्रिया सचदेवासोबत आपले आयुष्य नव्याने सुरू केले आणि तिच्याशी तिसरं लग्न केलं. मात्र करिश्माशी घटस्फोट झाल्यानंतरही , त्यांची दोन मुलं ही वडिलांना, अर्था संजयला अनेकदा अनेकदा भेटत असत.
