
Karisma Kapoor Ex Husband Sunjay Kapoor Death: अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती आणि कपूर कुटुंबाचा पूर्व जावई संजय कपूर याने 12 जून रोजी अखेरचा श्वास घेतला. परदेशात पोलो खेळत असताना संजय याने प्राण गमावले. वयाच्या 53 व्या वर्षी संजय याने प्राण गमावले आहेत. संजय याच्या निधनानंतर कुटुंबियांमध्ये दुःखाचं वातावरण आहेत. मधमाशी गिळल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.
अभिनेत्रीच्या कुटुंबातील सदस्यांनाही धक्का बसला आहे. तिच्या मुलांनाही वडिलांच्या निधनामुळे अश्रू आवरता आले नाहीत. दरम्यान, मृत्यूपूर्वी संजय कपूरचे शेवटचे ‘ते’ 5 शब्द कोणते होते… यावर जवळच्या व्यक्तीने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी काहीतरी गिळलं आहे…’ हे संजय कपूर याचे शेवटचे पाच शब्द होते.
संजयचा जवळचा मित्र सुहेल सेठ याने एएनआयला सांगितलं, ‘इंग्लंडमध्ये पोलो सामना खेळत असताना संजयचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सामन्यादरम्यान त्याने चुकून एक मधमाशी गिळली.’ एवढंच नाही तर, सुहेल याने संजय याचं कौतुक देखील केलं.
‘सर्वांना त्याची (संजय कपूर) आठवण येईल. त्याने अनेकांना नोकऱ्या दिल्या आणि अनेक मित्र बनवले. तो खूप आनंदी व्यक्ती होता. तो उदार आणि दयाळू होता. तो कोणातही भेदभाव करत नव्हता. तो सर्वांना पार्ट्यांमध्ये आमंत्रित करत असे.’ असं देखील मित्र संजय याच्याबद्दल म्हणाला आहे.
इंग्लंडमध्ये मृतदेह असल्यामुळे संजय कपूर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास विलंब होत आहे. रिपोर्टनुसार. संजय हा अमेरिकन नागरिक होता आणि त्याचे निधन लंडनमध्ये झालं, त्यामुळे त्याचं शरीर भारतात परत आणण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली आहे.
संजय कपूर याचे सासरे, म्हणजे तिसरी पत्नी प्रिया सचदेव हिचे वडील अशोक सचदेव यांनी अपडेट दिले की, ‘पोस्टमार्टम अजूनही सुरू आहे. कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर, मृतदेह अंतिम संस्कारांसाठी भारतात आणला जाईल.’ सध्या सर्वत्र संजय कपूर याच्या निधनाची चर्चा सुरु आहे.