AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karisma Kapoor : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने लावली बोली, सासूकडून छळ… करिश्माच्या वैवाहिक आयुष्यातील असह्य वेदना

Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण करिश्मा तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा कमी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते... आज करिश्माच्या वढदिवशी जाणून घ्या तिच्या वैवाहिक आयुष्यातील असह्य वेदना

Karisma Kapoor : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने लावली बोली, सासूकडून छळ... करिश्माच्या वैवाहिक आयुष्यातील असह्य वेदना
| Updated on: Jun 25, 2026 | 2:52 PM
Share

Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 90 च्या दशकात तर करिश्मा हिने सर्व लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकत, इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख भक्कम केलेली. आज करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा देखील होता जेव्हा करिश्मा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलेली. अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत झालेल्या साखरपुडा मोडल्यानंतर करिश्मा हिने 2003 मध्ये उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. करिश्मासोबत संजय याचं दुसरं लग्न होतं. पण दोघांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज करिश्मा दोन मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे. पण घटस्फोटादरम्यान अभिनेत्रीने संजय याच्यावर गंभीर आरोप केलेले.

रिपोर्टनुसार, करिश्मा म्हणाली होती, ‘जेव्हा आम्ही हनीमूनसाठी गेलो होतो. तेव्हा संजय याने त्याच्या मित्रांसोबत माझ्यावर बोली लावली होती. त्याने माझ्यावर मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेव… अशी बळजबरी केली होती. पण जेव्हा करिश्माने नकार दिला तेव्हा संजय याने अभिनेत्रीला मारहाण केली…’ यावर संजयने देखील मोठा खुलासा केलेला, ‘करिश्मा हिने माझ्यासोबत फक्त पैशांसाठी लग्न केलं…’ असं संजय म्हणालेला.

करिश्मा कपूर ही संजय याची दुसरी पत्नी होती. पण अभिनेत्रीला दुसरी पत्नी म्हणून अनेक संकटांचा सामना करावा लागला. करिश्मा सोबत दुसरा संसार थाटल्यानंतर देखील संजय याचे पहिल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध होते… असं देखील अनेकदा समोर आलं. एवढंच नाही तर, असं देखील म्हणतात की, सासूने देखील अभिनेत्रीचा छळ केला. करिश्माला वैवाहिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. तेव्हा करिश्मा प्रेग्नेंट होती. करिश्मा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 2003 मध्ये संजय याने करिश्मा हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. पण दोघांचं नातं दोन मुलांच्या जन्मानंतर देखील फार काळ टिकलं नाही. घटस्फोटाच्या दरम्यान दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. अखेर 2016 मध्ये करिश्मा आणि संजय यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर 2017 मध्ये संजय याने प्रिया हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे…

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?