AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hindi: ‘हिंदी भाषेबाबत किच्चा सुदीप जे बोलला ते योग्यच’; अजय देवगणविरोधात कर्नाटकचे नेते एकवटले

हिंदी (Hindi) ही राष्ट्रभाषा नाही, असं सुदीपने म्हटलं होतं. त्यावर अजयने ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि किच्चा सुदीप (Kichha Sudeep) यांच्यात झालेल्या ट्विटरवॉरमध्ये उडी घेतली आहे.

Hindi: 'हिंदी भाषेबाबत किच्चा सुदीप जे बोलला ते योग्यच'; अजय देवगणविरोधात कर्नाटकचे नेते एकवटले
अजय देवगणविरोधात कर्नाटकचे नेते एकवटलेImage Credit source: Facebook
| Updated on: Apr 28, 2022 | 3:20 PM
Share

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि किच्चा सुदीप (Kichha Sudeep) यांच्यात झालेल्या ट्विटरवॉरमध्ये उडी घेतली आहे. ‘हिंदी (Hindi) ही भारताची राष्ट्रीय भाषा ना कधी होती आणि ना कधी असणार,’ असं त्यांनी म्हटलंय. हिंदी भाषेवरूनच अजय आणि आणि सुदीप यांच्यात ट्विटरवॉर झाला होता. त्यावरून काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या म्हणाले, ‘मला कन्नड असल्याचा अभिमान आहे. देशातल्या भाषिक विविधतेचं कौतुक करणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. प्रत्येक भाषेचा स्वतःचा समृद्ध इतिहास आहे, ज्याचा लोकांना अभिमान आहे.’ हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असं सुदीपने म्हटलं होतं. त्यावर अजयने ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही या वादात उडी घेतली आहे. ‘भारतात 19500 मातृभाषा बोलल्या जातात. भारताबद्दलचं प्रेम प्रत्येक भाषेत सारखंच आहे. एक अभिमानी कन्नडिगा आणि अभिमानी काँग्रेसी या नात्याने मी सर्वांना या गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो की काँग्रेसने भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती केली, जेणेकरून कोणतीही भाषा दुसर्‍या भाषेवर वर्चस्व गाजवू नये. #विविधतेत एकता’, असं ते म्हणाले. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडी (एस)चे नेते एचडी कुमारस्वामी यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली. ‘सुदीपच्या वक्तव्यात काहीही चुकीचं नाही,’ असं ते म्हणाले.

एचडी कुमारस्वामी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं की, ‘हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं किच्चा सुदीपचं म्हणणं योग्य आहे. त्याच्या वक्तव्यात चुकीचं असं काही नाही. अजय देवगण हा केवळ स्वभावानेच तापट नाही तर त्याच्या ट्विटमध्येही विचित्र वागणुकीची प्रचिती येते. केवळ लोकसंख्येतील अनेक लोक हिंदी बोलतात म्हणून ती राष्ट्रभाषा होत नाही. हिंदी ही 9 पेक्षा कमी राज्यांमध्ये प्राथमिक भाषा म्हणून बोलली जाते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बहुतेक राज्यांमध्ये ती दुसरी, तिसरी भाषा म्हणून आहे किंवा तीसुद्धा नाही. अशी परिस्थिती असताना अजय देवगणच्या विधानात तथ्य काय? कन्नड सिनेसृष्टी ही हिंदी चित्रपटसृष्टीला मागे टाकतेय हे अजयने लक्षात घ्यायला हवं. कन्नडिगांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचा विकास झाला. अजय देवगणने हे विसरू नये की त्याचा पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’ बेंगळुरूमध्ये वर्षभर चालला होता.’

अजय आणि किच्चा सुदीप यांच्यातील वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘किच्चा सुदीपने जे सांगितलं ते बरोबर होतं. प्रादेशिक भाषा ही सर्वात महत्त्वाची असते कारण राज्याची निर्मिती भाषिक आधारावरूनच होते. सुदीप जे बोलला ते सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे,’ असं ते म्हणाले.

Follow Us
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...