Kartik Aaryan | कोरोनामुक्त झालेल्या कार्तिक आर्यनने खरेदी केली Lamborghini, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. तो बर्‍याचदा वेगवेगळ्या कारमधून फिरताना दिसतो. तर कधीकधी तो बुलेटवरही दिसतो. आता कार्तिकने साडेचार कोटींची लॅम्बोर्गिनी कार विकत घेतली आहे.

Kartik Aaryan | कोरोनामुक्त झालेल्या कार्तिक आर्यनने खरेदी केली Lamborghini, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
कार्तिक आर्यन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) नुकताच कोरोना विषाणूचा यशस्वीरित्या पराभव केला आहे. सोमवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्याने आपल्या कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. त्याच संध्याकाळी त्याने एक नवीन कार खरेदी केली आहे. कार्तिकने आपल्या महागड्या कारसह व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने खास कॅप्शनही दिले आहे (Kartik Aaryan bought Lamborghini car from Italy).

कार्तिक आर्यनने आपल्या नवीन ब्लॅक Lamborghini कारचा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, ‘… आणि विकत घेतली… पण मी बहुधा महागड्या वस्तूंसाठी बनवलेला नाही.’ व्हिडीओमध्ये, कार्तिक आपल्या कारसमोर पोज करत होता आणि अचानक मागे पॉपरचा ब्लास्ट झाला. ज्यानंतर तो एकदम दचकला. बर्‍याच सेलिब्रिटींनी कार्तिकच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनीही त्याचे भरभरून अभिनंदन केले आहे.

पाहा कार्तिक आर्यनची नवी गाडी

बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. तो बर्‍याचदा वेगवेगळ्या कारमधून फिरताना दिसतो. तर कधीकधी तो बुलेटवरही दिसतो. आता कार्तिकने साडेचार कोटींची लॅम्बोर्गिनी कार विकत घेतली आहे. ही कर भारतीय नसून, त्याने थेट इटलीमधून भारतात आणली आहे.

कार्तिकने त्याच्या स्वप्नातली कार इटलीहून मुंबईत आणण्यासाठी 50 लाख रुपये अतिरक्त कर भरले आहेत आणि तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला त्याच्या गाडीची डिलिव्हरी मिळाली आहे (Kartik Aaryan bought Lamborghini car from Italy).

गाड्यांचे कलेक्शन

या व्यतिरिक्त कार्तिककडे स्वतःच्या मालकीची बीएमडब्ल्यूची गाडी आहे, जी त्याने 2017मध्ये खरेदी केली होती आणि नुकतीच  2019मध्ये कार्तिकने आपल्या आईला मिनी कूपरच्या कार भेट म्हणून दिली, जी त्याच्या आईची आवडती कार आहे. 2017पासून कार्तिकच्या कारकीर्दीने जोर धरला. आजच्या घडीला कार्तिक बॉलिवूडच्या महागड्या कलाकारांपैकी एक आहे.

कोरोना काळात पाहत होता एकता कपूरच्या मालिका!

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर कार्तिक आर्यनने स्वत:ला क्वारंटाईन केले होते. तो आपला मोकळा वेळ सोशल मीडियावर सक्रिय राहण्यात घालवत होता. चाहत्यांसाठी पोस्ट शेअर करण्याबरोबर तो टीव्हीवर मालिका पहात होता. त्याबद्दल त्यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली होती. एकता कपूरची ‘कुम कुम भाग्य’ ही मालिका पाहत कार्तिकने स्वतःचा वेळ घालवला.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, कार्तिक आर्यन कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्यासह आगामी ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. चित्रपटाचे दिग्दर्शक अनीज बाझमी कार्तिकच्या लवकरच परत येण्याची वाट पहात होते, जेणेकरून पुन्हा शूटिंग सुरू होऊ शकेल. आता कार्तिक ‘भूल भूलैया 2’ च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. याशिवाय त्यांचा ‘धमाका’ हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कार्तिक जान्हवी कपूरसोबत करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’मध्येही दिसणार आहे.

(Kartik Aaryan bought Lamborghini car from Italy)

हेही वाचा :

Radhe Update | कोरोनाचा मोठा फटका, सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर?

Dia Mirza | हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते, दिया मिर्झाची कबुली

Published On - 4:56 pm, Tue, 6 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI