Radhe Update | कोरोनाचा मोठा फटका, सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर?

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकारणांमुळे महाराष्ट्रात सरकार काही नवीन निर्बंध लादले आहे. ज्यात पुढील आदेश होईपर्यंत सिनेमा हॉल आणि थिएटरलाही ‘टाळेबंद’ केले गेले आहे.

Radhe Update | कोरोनाचा मोठा फटका, सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर?
सलमान खान
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 4:10 PM

मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकारणांमुळे महाराष्ट्रात सरकार काही नवीन निर्बंध लादले आहे. ज्यात पुढील आदेश होईपर्यंत सिनेमा हॉल आणि थिएटरलाही ‘टाळेबंद’ केले गेले आहे. अशा परिस्थितीत फिल्म निर्मात्यांनी सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित ‘राधे- युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) हा चित्रपट इतक्यात रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे (Salman Khan Upcoming Movie Radhe will postpone due to corona).

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देशातील बर्‍याच राज्यांत रेकॉर्ड ब्रेकिंग प्रकरणे नोंदवली जात आहेत. महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा हाताबाहेर जाऊ लागला आहे. केवळ सामान्य जनताच नाही तर, बॉलिवूडमधील स्टार एकामागून एक कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या बातम्या समोर येत आहेत.

नुकतीच मिळाली होती परवानगी!

विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने नुकतीच 50 टक्के क्षमतेची थिएटर उघडण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर फिल्ममेकर्सनी त्यांचे रखडलेले चित्रपट लवकरात लवकर रिलीज करण्यासाठी तारखादेखील बुक केल्या. पण आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्र सरकारने नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. नव्या निर्बंधांनुसार पुन्हा एकदा सिनेमा हॉल, थिएटर आणि मल्टिप्लेक्स बंद करण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर पुन्हा लॉकडाऊन लावल्याने फिल्म इंडस्ट्रीची निराश झाली आहे. बऱ्याच लोकांना अशी आशा होती की, सलमान खानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर प्रसिद्धीचा विक्रम मोडेल. पण सद्य परिस्थिती पाहता आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे कळते आहे (Salman Khan Upcoming Movie Radhe will postpone due to corona).

कोरोना लॉकडाऊनचे सावट

माध्यमांच्या वृत्तानुसार, सध्याच्या बिकट परिस्थितीमुळे चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करू इच्छित नाहीत. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर सर्व राज्यात पुन्हा एकदा काही निर्बंध घातले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट राधेचे प्रदर्शन इतक्यात होणे शक्य नाही.

चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करणार!

लॉकडाऊनच्या वेळी चित्रपटगृहाचे झालेले नुकसान पाहाता, अभिनेता सलमान खानने आपला आगामी चित्रपट अर्थात ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’’ हा थिएटरमध्येच प्रदर्शित करणार असल्याचे जाहीर केले होते. हे जाहीर करताना सलमानने लिहिले होते की, ‘सॉरी … मला सर्व चित्रपटगृहांच्या मालकांकडे लक्ष देण्यास वेळ लागला आणि मी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांची आर्थिक समस्या मी समजू शकतो. यामुळे मी माझा आगामी चित्रपट राधे हा चित्रपटगृहात प्रदर्शित करून त्यांना मदत करणार आहे.’ सलमानने चित्रपटगृहांच्या मालकांना सांगितले की, चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची सर्व काळजी त्यांनी घेतली पाहिजे.

(Salman Khan Upcoming Movie Radhe will postpone due to corona)

हेही वाचा :

Deeksha Ketkar | अभिनेता शशांक केतकरची बहीण नव्या मालिकेत, मुख्य भूमिकेत!

PHOTO | मैत्रीचा लॉकडाऊन संपून सुरु होणार प्रेमाचा अनलॉक, ओम करणार स्वीटूला रोमँटिक प्रपोज!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.