Radhe | ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी…’ म्हणत भाईजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा ‘राधे’चे धमाकेदार पोस्टर…

सलमानने आपल्या आगामी ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. चाहते बरेच दिवस ‘राधे’च्या नव्या अपडेटची वाट पाहत होते.

Radhe | ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी...’ म्हणत भाईजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा ‘राधे’चे धमाकेदार पोस्टर...
भाईजान सलमान खान ‘राधे’ या चित्रपटातील 80% प्रॉफीट शेअर करणार आहे.

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान नेहमी चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. सलमान सध्या त्याच्या ‘टायगर 3’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण, यादरम्यान सलमान खानने आपल्या चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. सलमानने आपल्या आगामी ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. चाहते बरेच दिवस ‘राधे’च्या नव्या अपडेटची वाट पाहत होते. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे (Salman Khan Upcoming Film Radhe release date declare).

‘राधे’मध्ये सलमान खानसोबत अभिनेत्री दिशा पाटनी दिसणार आहे. म्हणूनच, दिशा पाटनी या चित्रपटाच्या  प्रमोशनसाठी बिग बॉस 14च्या फिनालेच्या अगदी आधीच्या भागात पोहोचली होती. त्यांच्यासोबत या चित्रपटात दिसलेला रणदीप हुड्डाही यावेळी मंचावर दाखल झाला. त्यावेळी सलमानने यंदाच्या ईदच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले होते. पण, आता चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार ‘राधे’?

बर्‍याच दिवसांपासून भाईजानला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सलमान खानच्या चाहत्यांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. यावर्षी मे महिन्यात सलमान खानचा चित्रपट राधे प्रदर्शित करणार आहे. खुद्द सलमान खान याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘राधे’ चित्रपटाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली आहे.

या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सलमान खानने ट्विट केले आहे की, ‘आजपासून 2 महिन्यांनंतर ‘राधे’ 13 मे रोजी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.’ सलमानने चाहत्यांसाठी चित्रपटाशी संबंधित एक पोस्टरही शेअर केले आहे. यासह सलमान खानने लिहिले आहे की, ‘ईदची कमिटमेंट होती, मी ईदवर येणार आहे, कारण एक बार जो मैने कमिटमेंट कर दी…’(Salman Khan Upcoming Film Radhe release date declare)

पाहा सलमानचे ट्विट

सलमानने नेहमीप्रमाणे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आपल्या खास शैलीत चाहत्यांसमोर जाहीर केली. सलमानच्या चाहत्यांसाठी ही एक उत्तम भेट ठरणार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर सलमानचे चाहते खूप आनंदित झाले आहेत.

अजय देवगणशी खास कनेक्शन

शाहरुखशिवाय अभिनेता अजय देवगणचे देखील सलमानच्या राधेशी असलेले खास कनेक्शन समोर आले आहे. असे सांगितले जात आहे की, अजय देवगणच्या एनवाय व्हीएफएक्सवाला यांनी चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये कलर वर्क केले आहे. वास्तविक, ही कंपनी मुख्यतः इनहाऊस प्रकल्पांवर काम करते आणि त्या प्रकल्पांमध्ये अजय देवगण दिसणार असतो. याशिवाय अजय देवगणचे निकटचे मित्रही यातून मदत घेतात. सलमान खान हा देखील अजय देवगणचा अगदी जवळचा मित्र आहे. म्हणूनच अजय देवगणची ही कंपनीही त्यांच्या चित्रपटासाठी काम करणार आहे.

हा चित्रपट सिंगल स्क्रीन एंटरटेनर म्हणून रिलीज करणार असल्याचे बोलले जात आहे. इंडियन प्रो म्युझिक लीगच्या लॉन्चवेळी सलमानने माध्यमांना सांगितले होते की, त्याचे आणखी तीन मोठे चित्रपट यंदा रिलीजसाठी तयार आहेत.

(Salman Khan Upcoming Film Radhe release date declare)

हेही वाचा :

Aayush Sharma | ‘अंतिम’चे शूट संपवून आयुष शर्मा मालदीवला रवाना, पत्नी आणि मुलांसमवेत धमाल, पाहा फोटो…

‘Slumdog Millionaire’ फेम मधुर मित्तलला कोर्टाचा दिलासा, मैत्रिणीने केलेला शोषणाचा आरोप