Katrina Kaif | पती विकी कौशलसह नव्हे ‘या’ व्यक्तीसोबत कतरिनाने घालवला सर्वात जास्त वेळ
अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ती एका खास व्यक्तीसह दिसत आहे.

Katrina Kaif Post : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) ही तिच्या सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी नावाजली जाते. तिचे लाखो-करोडो फॅन्स आहेत. कतरिना या इंडस्ट्रीत 20 वर्षांहून अधिक काळ आहे. सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून कतरिना अनेकदा तिच्या चाहत्यांना चित्रपटांबद्दल, कामाबद्दल माहिती देत असते.
कतरिनाने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती एका खास व्यक्ती आहे. हा फोटो तिचा पती विकी कौशल किंवा इतर कोणा मित्रांसोबतचा नाही तर अशा व्यक्तीचा आहे जी तिच्यासोबत गेल्या २० वर्षांपासून आहे. ती व्यक्ती म्हणजे कतरिनाचे पर्सनल असिस्टंट, अशोक शर्मा आहेत.
कॅटने शेअर केला फोटो
कतरिनाने अशोक यांच्यासोबतचा फोटो शेअर करत एक सुंदरशी कॅप्शनही लिहीली आहे. Mr. Ashok Sharma…या व्यक्तीने गेल्या २० वर्षात माझ्यासोबत सर्वात जास्त वेळ घालवला आहे. एकत्र हसणं – मजा करणं असो किंवा मोटिव्हिशेनल गप्पा मारणं असो… मी सांगितलेल्या गोष्टी न पिण्याबद्दल झालेलं भांडण असो किंवा मला खरंच काय हव याबाबत माझं मत मीच बदलणं असो…ते नेहमी सोबत होते. सेटवर मला कोणी त्रास दिला तर अशोकजी रडले.
आयुष्याती या सर्व प्रवासात आम्ही एकत्र होतो. मनमिळाऊ चेहरा असलेले ते सतत सोबत होते, मला काय हवं आहे हे मी सांगण्यापूर्वीच त्यांना समजतं, त्यांनी सतत माझ्यावर लक्ष ठेवलं.’ अशा शब्दांत कतरिनाने तिच्या भावना व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील २० वर्षही त्यांच्यासोबत घालवण्याची इच्छा व्यक्त केली.
View this post on Instagram
अनेक सेलिब्रिटींनी केल्या कमेंट्स
प्रियांका चोप्रा पासून ते मिनी माथूरपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या पोस्टवर कमेंट करत अशोक यांचे कौतुक केले, तसेच अभिनंदनही केले.
कामाबद्दल बोलायचं झालं तर, कतरिना कैफ ही शेवटची ‘फोन भूत’ या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत दिसली होती. ती लवकरच विजय सेतुपतीसोबत मेरी ख्रिसमसमध्ये दिसणार आहे. याशिवाय सलमान खानसोबत टायगर 3 मध्ये धमाल करायलाही कतरिना तयार आहे.
