कतरिना कैफ 42 व्या वर्षी बनणार आई; पण 40 नंतर नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे शक्य आहे का?
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ वयाच्या 42 व्या वर्षी आई होणार आहे. कतरिना आणि विकी कौशल यांनी ही गुड न्यूज सोशल मीडियावर सांगितली आहे. पण सोबतच असाही प्रश्न पडला आहे 40 व्या वर्षी किंवा त्यानंतर महिलांसाठी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता कितपत असते? चला जाणून घेऊयात.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याचं अखेर सत्य समोर आलं आहे. कतरिना आणि विकी कौशल हे आई-बाब होणार आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून याबद्दल गुड न्यूज प्रेक्षकांना दिली आहे.
वयाच्या 42 व्या वर्षी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे शक्य आहे का?
रिपोर्टनुसार कतरिना ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण सध्या कतरिना कैफचं वय हे 40 च्या वर आहे. ती सध्या 42 वर्षांची आहे. त्यामुळे सर्व चाहत्यांना तिच्या आई होण्याचा आनंद तर आहे पण सोबतच असाही प्रश्न पडला आहे की वयाच्या 42 व्या वर्षी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे शक्य आहे का? ते अगदी सहजपणे घडू शकतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चला जाणून घेऊयात याबदद्ल.
सामान्यतः असे मानले जाते की महिलांची प्रजनन क्षमता किंवा त्यांची गर्भधारणा करण्याची क्षमता 35 वर्षांच्या वयानंतर हळूहळू कमी होते आणि 40 वर्षांच्या वयानंतर हे आणखी तीव्रतेने कमी होते. म्हणूनच 40 वर्षांनंतर गर्भधारणा कठीण मानली जाते. स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितल्या प्रमाणे एखाद्या महिलेला गर्भधारणा झाली तर तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते?
जन्माच्या वेळी 10 लाख अंडी असतात
स्त्रीरोगतज्ज्ञांच्यामते जन्माच्या वेळी एका महिलेच्या शरीरात 10 लाख अंडी असतात, परंतु कालांतराने त्यांची संख्या कमी होत जाते आणि रजोनिवृत्तीच्या म्हणजे मेनोपॉजच्या सुमारे 15 वर्षांपूर्वी, सर्व चांगली अंडी नष्ट होतात.
निरोगी अंडी 35 वर्षांच्या वयानंतर टिकत नाहीत
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार महिलांमध्ये दर महिन्याला ओव्हुलेशन होतं. परंतु वयानुसार अंड्यांची संख्या हळूहळू कमी होत जाते. शिवाय, उर्वरित बहुतेक अंड्यांमध्ये गुणसूत्र विकृती म्हणजे क्रोमोसोमल अबनॉर्मलिटीज आढळून येतात. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की 32, 33 किंवा 35 वर्षांच्या वयापर्यंत, महिलांमध्ये निरोगी अंड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी होत जातो.
मेनोपॉजच्या 15 वर्षांपूर्वी अंड्यांची गुणवत्ता खराब होते
डॉ. प्रिया स्पष्ट करतात की, भारतात, महिलांना साधारणपणे 50 ते 51 वयोगटात रजोनिवृत्तीचा मेनोपॉजचा अनुभव येतो. तथापि, याच्या सुमारे 15 वर्षांपूर्वी, 35 ते 36 वयोगटात, बहुतेक महिलांची प्रजनन क्षमता खूपच कमी पातळीवर पोहोचते. समस्या अशी आहे की महिलांना अनेकदा वेळेत याची जाणीव होत नाही.
याचे मुख्य कारण म्हणजे या वयातही महिलांना नियमित मासिक पाळी येत राहते. यामुळे त्यांना असे वाटते की सर्वकाही सामान्य आहे आणि त्यांना अजूनही मुले होऊ शकतात, परंतु वास्तविकता अशी आहे की अंड्यांची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही लक्षणीयरीत्या या वयात कमी झालेले असते.
निरोगी अंडी 32 ते 35 वयोगटात टिकत नाहीत
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की महिलांमध्ये दर महिन्याला ओव्हुलेशन होते, परंतु वयानुसार अंड्यांची संख्या हळूहळू कमी होत जाते. शिवाय, उर्वरित बहुतेक अंड्यांमध्ये गुणसूत्र विकृती असतात. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की ३२, ३३ किंवा ३५ वर्षांच्या वयापर्यंत, महिलांमध्ये निरोगी अंड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी होतो.
आयव्हीएफ हा मार्ग कितपत यशस्वी होऊ शकतो?
काही वेळेला लोक सहसा असा विचार करतात की जर स्त्री नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकत नसेल तर IVF म्हणजे (टेस्ट ट्यूब फर्टिलायझेशन) हा एक मार्ग असतो. पण वास्तविकता अशी आहे की वाढत्या वयानुसार IVF यशस्वी होण्याचे चांजेस देखील कमी होतात.
40 नंतर गर्भधारणेचे धोके काय असू शकतात?
तज्ज्ञांच्या मते वयाच्या 35 वर्षांनंतर गर्भवती होणाऱ्या महिलांना गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. या वयात लठ्ठपणा देखील वेगाने वाढतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका थोडा जास्त होतो. वयानुसार सामान्य प्रसूतीची शक्यता कमी होते म्हणजे त्यासाठी सी-सेक्शनची आवश्यकता भासू शकते.
मुलांना ही समस्या येऊ शकते का?
डॉक्टरांचे म्हणणे आहे की 40 वर्षांनंतर गर्भधारणेमुळे बाळाला काही आजारांचा धोका संभवू शकतो. यामध्ये टाइप 1 मधुमेह हा अनुवांशिक आजार समाविष्ट आहे. काही प्रकरणांमध्ये, मुलाला डाउन सिंड्रोम सारखी स्थिती असू शकते. जन्मापासूनच बाळाला मानसिक विकार किंवा थायरॉईड रोग होण्याचा धोका देखील असतो, जरी सर्वच प्रकरणांमध्ये असचं घडेल असं नाही.
या गोष्टी लक्षात ठेवा
खरंतर अनेकदा हे प्रत्येक महिलेच्या वैद्यकीय स्थितीवर अवलंबून असते. खरं तर, 40 वर्षांनंतर 150 पैकी एका गर्भधारणेला या आजारांचा धोका असतो. म्हणून, महिलांना बाळाचे नियोजन करण्यास उशीर करू नका असा सल्ला दिला जातो. जर काही कारणास्तव त्यांना असे करण्यास भाग पाडले गेले तरी अशा वेळेस पुरेशी झोप घेणे, निरोगी आहार असणे, मानसिक ताण टाळणे आणि नियमितपणे तपासणी करणे यासारख्या काही खबरदारी घेतल्या पाहिजेत. शिवाय, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच 40 वर्षांनंतर गर्भधारणेचे नियोजन करणे चांगले आहे.
