Big Boss 14 | कविता कौशिकच्या पतीचा ‘बिग बॉस’ स्पर्धकावर आरोप, अभिनववर अप्रत्यक्ष निशाणा

रोनितनं आता एक पोस्ट शेअर करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. (Kavita Kaushik's husband accuses 'Bigg Boss' contestant, indirectly targeting Abhinav)

  • Updated On - 5:31 pm, Fri, 4 December 20
Big Boss 14 | कविता कौशिकच्या पतीचा 'बिग बॉस' स्पर्धकावर आरोप, अभिनववर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई : ‘बिग बॉस 14’ मधील स्पर्धक कविता कौशिक सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. काही दिवसांपूर्वीच कविता आणि एजाज खानच्या वादाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. ही चर्चा संपत नाही तोच, आता तिचा रुबीनासोबत झालेला वाद चर्चेत आला. आता चक्क कविताच्या पतीनं बिग बॉसच्या एका स्पर्धकावर आरोपच लावलेत. आश्चर्याची बाब म्हणजे आता हा स्पर्धक एजाज खान किंवा रुबीना नसून कुणी तरी दुसराच व्यक्ती आहे.

अभिनववर साधला निशाणा!
कविता कौशिकचा पती रोनितनं आता एक पोस्ट शेअर करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्याच्या या पोस्टमध्ये स्पष्टपणे कुणाचं नाव लिहिलेलं नसलं तरी ही पोस्ट अभिनव शुक्लाबद्दल लिहिली असल्याची चर्चा आहे. अभिनवमुळे कविताला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं आणि याच व्यक्तीबद्दल कवितानं फ्रेंड्स विथ बेनिफिटचीही गोष्ट बोलून दाखवली होती. आता रोनितच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अभिनव शुक्ला आणि कविता कौशिकचे फॅन्स एकमेकांमध्ये वाद घालत आहेत.

ट्विटमध्ये नक्की काय ?
‘मला तुम्हाला इथं एक खरी गोष्ट सांगायची आहे. मी एका जंटलमनविषयी बोलत आहे जो सज्जन नाही. या व्यक्तीला मद्यपान करण्याची घाणेरडी सवय आहे. मद्यपान केल्यानंतर तो बर्‍याचदा रात्रीच्या वेळी कविताला मेसेज करतो आणि भेटण्याचा हट्ट करतो. त्याच्या या सवयीने त्रस्त झाल्यामुळे कविताला पोलिसांना बोलवावं लागलं’, असं ट्विट रोनितनं ट्विटरवर शेअर केलं आहे.

सोशल मीडियावर वाद सुरु
आता बिग बॉसच्या घरातील वाद सोशल मीडियापर्यंत पोहचला आहे. कविताचा पती रोनितच्या ट्विटनंतर आता सोशल मीडियावर अभिनव शुक्ला आणि कविता कौशिकचे फॅन्स आमने-सामने आहेत. दोघांचेही फॅन्स एकमेकांमध्ये वाद घालत आहे. आता रोनितचं हे ट्विट अभिनव आणि रुबीनासाठी नवीन अडचणी निर्माण करणार असं दिसत आहे.

संबंधित बातम्या

Bigg Boss 14 | ‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!

Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI