AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 18 : हुंड्यासाठी महिलेसोबत जे घडलं, ऐकून बिग बींच्याही डोळ्यात पाणी, मुलीला तर…, नकोसं झालेलं आयुष्य

KBC 18 : हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी ओलांडल्या सर्व मर्यादा, महिले जे सांगितलं, ते ऐकून बिग बींच्याही डोळ्यात आलं पाणी.. तिच्या मुलीला तर..., नकोसं झालेलं महिलेला आयुष्य... जाणून घ्या महिलेने बिग बींनी काय सांगितलं?

KBC 18 : हुंड्यासाठी महिलेसोबत जे घडलं, ऐकून बिग बींच्याही डोळ्यात पाणी, मुलीला तर..., नकोसं झालेलं आयुष्य
Amitabh Bachchan
| Updated on: Sep 19, 2026 | 2:30 PM
Share

KBC 18 : महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कोन बनेगा करोडपती’ हा शो प्रश्न – उत्तरांचा आणि पैसे जिंकण्याचा असला तर, शोमध्ये अनेकदा अशी वेळ आली आहे, जेव्हा स्पर्धक त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक सिक्रेट सर्वांसमोर सांगतात. आता देखील असंच काही झालं आहे. ‘कोन बनेगा करोडपती 18’ शोमध्ये एक महिला आली आणि तिने स्वतःची व्यथा सांगितली. अशात तिच्यासोबत जे काही घडलं हे ऐकून बिग बींच्या डोळ्यात देखील पाणी आलं. KBC 18 च्या एका भागात, छत्तीसगडमधील बिलासपूर येथील कपिला तनेजा यांच्या कहाणी ऐकून बिग बींच्या डोळ्यात पाणी आलं.

अमिताभ बच्चन यांच्या समोर ‘हॉट सीट’वर बसलेल्या कपिला यांनी त्यांच्या आयुष्यातील एका अत्यंत वेदनादायक टप्प्याबद्दल सांगितलं; या काळात हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास दिला आणि जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर, या घटनेनंतर त्या स्वतःच्या मुलीपासून दुरावल्या गेल्या आणि गेल्या 24 वर्षां त्यांनी स्वतःच्या लेकीला पाहिलेलं नाही.

कपिला यांनी सांगितल्यानुसार, त्यांचा लग्न कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध झाला होता. त्यांचे सासरचे मंडळी या नात्यावर खूश नव्हती आणि त्यांच्या माहेरकडून हुंड्याची अपेक्षा करत होते. लग्नानंतर परिस्थिती बिघडत गेली आणि त्यांना त्रास सहन करावा लागला. कपिला यांच्या मते, 2002 मध्ये त्यांच्या बाबतीत ‘अग्निकांड’ घडलं, ज्यामध्ये त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितलं की, त्या वेळी त्यांची लहान मुलगीही होती. ही घटना इतकी गंभीर होती की कपिला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बेशुद्ध होत्या. शुद्धीत आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया सुरू झाली.

कपिला सांगते की, सासूने आधी त्रास देण्यास सुरुवात केली, मग सासरच्या मंडळींनी संपूर्ण कट रचला. शेवटी त्यांनी माझ्यावर रॉकेल ओतून मेणबत्ती लावली. हिवाळ्याचे दिवस होते, साडी संपूर्ण शरीराला चिकटलेली. पण णी कसंतरी स्वतःला पाण्याच्या टाकीजवळ नेलं… 24 वर्ष झाली आहेत, मी अद्याप माझ्या मुलीला पाहिलं नाही, तिला भेटली नाही. यावर भावूक होत अमिताभ बच्चन म्हणतात, ‘तुमच्यासोबत काही घडलं आहे, त्याला आपण अन्याय देखील बोलू शकत नाही. कोणत्या महिलेसोबत असं होणं फार वाईट आहे.’

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?