
Khushi Mukherjee : उर्फी जावेद, कंगना शर्मा या अशा काही मॉडेल आहेत ज्या नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी परिधान केलेल्या विचित्र ड्रेसमुळे त्या नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात. आता या दोन्ही मॉडेल्ससोबतच खुशी मुखर्जी हे नावदेखील चर्चेत आहे. खुशी मुखर्जी यांनी घातलेल्या काही ड्रेसमुळे तिला इंटरनेटवर चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. या कपड्यांत ती अर्धनग्न असल्याचे दिसत होते. दरम्यान, आता याच अभिनेत्रीत्री एक अॅप तयार करून स्वत:ला दाखवत तसेच इतरांशी गप्पा करून तब्बल 10 कोटी रुपये कमवल्याचे समोर आले आहे.
खुशी मुखर्जी ही अभिनेत्री मुंबईत अनेकदा वेगवेगळ्या कपड्यांत स्पॉट झालेली आहे. काही वेळा तर तिने असे कपडे घातलेले आहेत, ज्यामुळे तिच्यावर टीकेची झोड उडालेली आहे. ही फॅशन नसून अश्लिलता आहे, असेही मत सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आले. तिने मात्र स्वत:चे समर्थन केलेले आहे. हे समर्थन करताना तिने काही अभिनेत्रींचे उदाहरण दिलेले आहे.
खुशी मुखर्जीने आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केलेलं आहे. स्प्लिट्सव्हिला 10, लव्ह स्कुल-3 या रिअॅलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतलेला आहे. या दोन शोंमुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली. तमिळ भाषेतील अंजल थुरई, तेलुगू भाषेतील डोंगा प्रेमा, हॉर्ट अटॅक आदी चित्रपटांतही तिने काम केले. तिने काही बी ग्रेड चित्रपटांतही काम केलेले आहे.
खुशी मुखर्जी आज करोडपती आहे. ती मुळची पश्चिम बंगालची आहे. अवघ्या 28 व्या वर्षांत ती करोडपती झाली आहे.सध्या तिची संपती 12 कोटी असल्याचे बोलले जाते. तिने एका मुलाखतीत एक अॅप बनवल्याचं सांगितलेलं आहे. हे अॅप बनवून तिने अवघ्या दोन महिन्यांत 10 कोटी रुपये कमवले होते. या अॅपमध्ये अश्लील कन्टेटं नव्हता मात्र काही लोक गप्पा करण्यासाठी एकत्र यायचे, असे तिने सांगितले हे. तसेच एका विदेशी नागरिकाने तिच्या अॅपला भेट देऊन तब्बल 1 कोटी 13 लाख रुपये खर्च केले होते, तिने सांगितले.