Kiara Sidharth | ‘यांना कोणीच भाव देईना’; परदेशात स्वत:च लगेज उचलल्याने कियारा-सिद्धार्थ ट्रोल

कियारा लवकरच रामचरणसोबत 'गेम चेंजर'मध्ये झळकणार आहे. त्याचसोबत ती हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरसोबत 'वॉर 2'मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. तर सिद्धार्थ आगामी 'योद्धा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kiara Sidharth | यांना कोणीच भाव देईना; परदेशात स्वत:च लगेज उचलल्याने कियारा-सिद्धार्थ ट्रोल
Kiara Advani and Sidharth Malhotra
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 02, 2023 | 2:56 PM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्या इटलीतील अमाल्फी याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. सोमवारी कियाराने तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. या दोघांच्या इटली व्हेकेशनमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघं लगेज घेऊन इटलीतील रस्त्यावर चालताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवरील एका फॅन अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या हातातील मोठमोठे लगेच घेऊन जाताना दिसत आहेत. एका मैत्रिणीला निरोप दिल्यानंतर दोघं इटलीच्या वर्दळीच्या भागातील एका बग्गीमध्ये आपलं लगेज घेऊन चढतात. यावेळी कियाराने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. तर सिद्धार्थने पिवळ्या रंगाचा शर्ट आणि हिरव्या रंगाचे शॉर्ट्स घातले होते.

सेलिब्रिटींचं व्हेकेशन कसं असतं हे पाहण्यासाठी चाहते बरेच उत्सुक असतात. मात्र हेच सेलिब्रिटी जेव्हा सर्वसामान्यांमध्ये परदेशात आपलं लगेज घेऊन फिरतात, तेव्हा चाहत्यांना त्याबद्दल थोडं नवल वाटणं साहजिक आहे. म्हणूनच सिद्धार्थ आणि कियाराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. ‘हे दोघं सर्वसामान्य कपलप्रमाणेच फिरत आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘अखेर त्यांना स्वत:चा लगेज उचलण्याची संधी मिळाली’, अशी उपरोधिक प्रतिक्रिया दुसऱ्या युजरने दिली. तर अनेकांनी पापाराझींना विनंती केली की त्यांनी त्यांचा पाठलाग करणं सोडून द्यावं.

वाढदिवशी कियाराने सोशल मीडियावर इटली व्हेकेशनदरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये सिद्धार्थसोबत ती समुद्रात डाइव्ह करताना दिसली. ‘मला वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रत्येक दिवसासाठी आणि इतक्या प्रेमासाठी मी खूप कृतज्ञ आहे’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं होतं. सिद्धार्थने हाच व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत, ‘हॅपी बर्थडे की. तुझ्यासोबत नेहमीच मी सर्वोत्तम वेळ घालवतो’, असं लिहिलं होतं.

कियारा लवकरच रामचरणसोबत ‘गेम चेंजर’मध्ये झळकणार आहे. त्याचसोबत ती हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरसोबत ‘वॉर 2’मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. तर सिद्धार्थ आगामी ‘योद्धा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वास पदार्पण करणार आहे. रोहित शेट्टीने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. त्याच्यासोबत विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.